esakal | ममता बॅनर्जींच्या पायाला दुखापत; हल्ल्याचा कट असल्याचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

ममता बॅनर्जींच्या पायाला दुखापत; हल्ल्याचा कट असल्याचा आरोप

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये प्रचार करत असताना एक दुर्घटना घडली. यामध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे.

ममता बॅनर्जींच्या पायाला दुखापत; हल्ल्याचा कट असल्याचा आरोप

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नंदीग्राम - assembly election 2021 पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे प्रचार मोहिमेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये प्रचार करत असताना एक दुर्घटना घडली. यामध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी घटनेनंतर आरोप केला की त्यांना जाणीवपूर्वक गाडीच्या जवळ असताना काही लोकांच्या गटाने ढकललं.

ममता बॅनर्जी यांनी कोलकात्याला नेण्यात येणार असल्याचं सुरुवातीला म्हटलं जात होतं. मात्र अद्याप त्या कोलकात्याला गेलेल्या नाहीत. नंदीग्राममध्ये आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की, माझ्या पायाला दुखापत झाली आहे. गाडीच्या शेजारी असातना काही लोकांनी मला ढकललं आणि दुखापत झाली.

हे वाचा - दिल्लीचा कारभार रामराज्याच्या प्रेरणेनं - अरविंद केजरीवाल

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी म्हणाल्या की, याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. दरम्यान, दुसरीकडे दुखापत झाल्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या निवडणूक प्रचाराच्या मोहिमेवरही परिणाम झाला आहे. त्यांचे अनेक कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. 

ममता बॅनर्जी यांनी आज नंदीग्राम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. येथे त्यांचा मुकाबला हा भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्याशी होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ममतांनी दोन किलोमीटरचा रोड शो देखील केला.

हे वाचा - मुलींना जिन्स, स्कर्ट घालण्यास मनाई; नियम मोडणाऱ्यास होणार शिक्षा

नंदीग्राममध्ये आपणच विजयी होऊ असा विश्‍वास व्यक्त करताना ममतांनी ‘भुलतो परी सोबर नाम, भुलबो नाको नंदीग्राम’ (मी प्रत्येकाचे नाव विसरू शकते पण नंदीग्रामला मात्र कधीच विसरू शकत नाही.) असा नाराही दिला. भूसंपादनविरोधी आंदोलनाचे केंद्र राहिलेल्या या शहरातून आपण कधीही रिकाम्या हाताने परतलो नसल्याचे त्यांनी सांगितले. 

loading image