esakal | ममता बॅनर्जी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार ? टीएमसीने दिलं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

mamata banerjee main 1.jpg

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी आणि एकेकाळी त्यांचे निकटचे सहकारी राहिलेले आणि नुकताच भाजपत सामील झालेले सुवेंदू अधिकारी यांच्यात काट्याची लढत पाहायला मिळाली.

ममता बॅनर्जी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार ? टीएमसीने दिलं उत्तर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोलकाता- West Bengal Assembly Election 2021 पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वात हायप्रोफाइल मतदारसंघ नंदीग्राममध्ये मतदान झाले. या मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि एकेकाळी त्यांचे निकटचे सहकारी राहिलेले आणि नुकताच भाजपत सामील झालेले सुवेंदू अधिकारी यांच्यात काट्याची लढत पाहायला मिळाली. मतदानानंतर भाजप सातत्याने आपल्या विजयाचा दावा करत आहे. त्याचबरोबर ममता बॅनर्जी या दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे भाजपकडून सातत्याने सांगितले जात आहे. परंतु, टीएमसीचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांनी भाजपचा हा दावा फेटाळला आहे. ममता बॅनर्जी या दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची भाजप अफवा पसरवत आहे. शुक्रवारी जेपी नड्डा हे पुन्हा एकदा खोटं बोलले आहेत. आम्ही त्यांच्या प्रत्येक माइंड गेमचे उत्तर देण्यास तयार आहोत. रस्त्यात इव्हीएम बदलले तर जाणार नाहीत ना, यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही ते म्हणाले. 

ज्यादिवशी नंदीग्राममध्ये मतदान होत होते. त्याचदिवशी बंगालमधील एका प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचा विजय निश्चित असून याची सुरुवात नंदीग्राममधून झाल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर ममतादीदी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचेही सभेत सांगितले होते. 

हेही वाचा- दोन मे नंतर भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार का? काय म्हणाले अमित शहा

तर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांचा पराभव निश्चित असून त्यांनी दुसऱ्या मतदारसंघाचा शोध सुरु केल्याचे म्हटले होते. ही त्यांची रणनीती आहे आणि याबाबत त्यांना चांगली माहिती आहे. ते आता मतदारसंघ शोधत आहेत. त्यांच्याच माणसांनी मला ही माहिती दिली आहे. त्यामुळे मी याची गॅरंटी घेऊ शकत नाही. कारण त्यांना हे माहीत आहे. परंतु, त्या नंदीग्राममधून पराभूत होणार हे निश्चित आहे. 
 

loading image