दोन मे नंतर भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार का? काय म्हणाले अमित शहा

amit shah bjp
amit shah bjp

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या तामिळनाडु दौऱ्यावर आहेत. पाच राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांचे प्रचार दौरे सुरु आहेत. या प्रचार दौऱ्यावेळी दिलेल्या मुलाखतीत अमित शहांनी शरद पवार यांच्यासोबत भेटीच्या चर्चेवर तसंच महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातील राजकारणात सध्या अनेक मुद्द्यांवरून वादळ आलं आहे. यामध्ये मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, सचिन वाझेंना अटक, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलिस आयुक्तांनी केलेले आरोप यामुळे महाविकास आघाडी सरकारला विरोधकांनी घेरलं आहे. यातच राज्यातील कोरोना स्थिती गंभीर झाली आहे.

आता पाच राज्यांच्या निवडणुका सुरु असून त्याचे निकाल 2 मे रोजी लागणार आहेत. त्यानंतर भाजपचं मिशन महाराष्ट्र सुरु होणार का? असा प्रश्न अमित शहांना इंडिया टूडेने घेतलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला होता. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीची होत असलेली चर्चा आणि त्यातच राज्यातील घडामोडी यामुळे राजकीय भूकंप होण्याची चर्चाही रंगली आहे. अमित शहा म्हणाले की, महाराष्ट्र सरकार कोरोनाला रोखू शकेल का? कोरोनाला रोखण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत असं उत्तर देत मूळ प्रश्नाला बगल दिली. 

अहमदाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी झालेल्या भेटीत काय चर्चा झाली? असा प्रश्न विचारला असता शहांनी त्यावर हसून उत्तर दिलं. शहा म्हणाले की, मिटिंग तर तुम्हीच केलीत, आता त्या मिटिंगमध्ये काय चर्चा झाली हेसुद्धा तुम्हालाच माहिती असेल, तुम्हीच सांगा असं म्हटलं. महाराष्ट्रात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? या प्रश्नावर अमित शहांनी हे आताच सांगणं कठिण असल्याचं म्हटलं आहे. 

महाराष्ट्रात शनिवारी 47 हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. राज्यात लॉकडाऊनचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिलाय. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबतही अमित शहांना विचारण्यात आलं. त्यावर अमित शहांनी सांगितलं की, महाराष्ट्रातील कोरोनाबाबत तिथलं सरकारच चांगलं सांगू शकेल. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून निर्णय घ्यायला हवा. केंद्र सरकार हवी ती मदत करण्यास तयार असल्याचंही अमित शहा म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com