esakal | सीआरपीएफबाबत वक्तव्य, ममतादीदींना निवडणूक आयोगाची आणखी एक नोटीस

बोलून बातमी शोधा

Mamata_Banerjee_3.jpg

आधीच्या नोटिसीवरुन निवडणूक आयोगाशी वाद सुरु असतानाच दुसरी नोटीस बजावण्यात आल्यामुळे आता ममता बॅनर्जींची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सीआरपीएफबाबत वक्तव्य, ममतादीदींना निवडणूक आयोगाची आणखी एक नोटीस
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोलकाता- West Bengal Assembly Election 2021 पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक नोटीस पाठवली आहे. केंद्रीय दलांबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन नोटीस पाठवली आहे असून शनिवारी सकाळी 11 पर्यंत याचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांनी 28 मार्च आणि 7 मार्चला केंद्रीय दलांविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी 10 एप्रिलपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. ममता बॅनर्जी यांनी मतदारांना सावध राहण्याचा सल्ला देताना केंद्रीय निमलष्करी दलाचे जवान गावातील लोकांना धमकी देऊ शकतात, असे म्हटले होते. त्यापूर्वी तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) केंद्रीय सुरक्षा दल बंगालमधील मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखत असल्याचा आरोप केला होता. आधीच्या नोटिसीवरुन निवडणूक आयोगाशी वाद सुरु असतानाच दुसरी नोटीस बजावण्यात आल्यामुळे आता ममता बॅनर्जींची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इशाऱ्यावर सीआरपीएफचे जवान राज्यातील मतदारांना त्रास देत असल्याचा आरोप केला होता. ममतांनी कूचबिहार जिल्ह्यातील एका प्रचारसभेत बोलताना केंद्रीय सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांवर निवडणुकीदरम्यान महिलांची छेड काढणे, लोकांना मारहाण करण्याचा आरोप केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, ते मतदारांना मतदान करण्यापासून रोखत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी त्यांना तसे करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनच निवडणूक आयोग चालव आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणाचा मृत्यू होऊ नये, याकडे कृपया लक्ष द्या. माझी तुम्हाला विनंती आहे की, अशा सीआरपीएफ कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवा जे राज्यात सध्या कर्तव्यावर आहेत. त्यांना महिलांची छेड काढण्यापासून रोखले पाहिजे. या केंद्रीय सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून मुलींची छेड काढल्याचे प्रकरणही समोर आले आहे. दि. 28 मार्च रोजी एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. 

हेही वाचा- 'पहचान कौन?'; अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

दरम्यान, यापूर्वी निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांनी हुगळी येथील प्रचारसभेत धार्मिक आधारावर मतदारांना मत देण्याचे आवाहन केले होते. त्याप्रकरणी बुधवारी एक नोटीस जारी केली होती. त्यांना 48 तासांच्या आत याचे उत्तर देण्यास सांगण्यात आले होते. निवडणूक आयोगाला भाजपच्या प्रतिनिधी मंडळाकडून तक्रार मिळाली आहे. यामध्ये आरोप आहे की, ममता बॅनर्जी यांनी हुगळी येथील तारकेश्वर येथील प्रचार सभेदरम्यान मुस्लिम मतदारांना विशिष्ट पक्षाला मतदान न करण्याचे आवाहन केले होते, असे नोटिसीत म्हटले होते. 

हेही वाचा- लशीच्या तुटवड्याचं अमेरिका, युरोप कनेक्शन; आदर पूनावालांनी दिली माहिती 

अशा 10 नोटिसा पाठवल्या तरी चालतील- ममतादीदी
ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी म्हटले होते की, धार्मिक आधारावर मतविभाजन करणाऱ्या शक्तींविरोधात आपण आवाज उठवणार असून निवडणूक आयोगाने अशा 10 नोटिसा जरी पाठवल्या तरी चालतील. पण मी आपल्या मतावर ठाम असेल. तुम्ही (निवडणूक आयोग) मला 10 नोटिसा पाठवू शकता. पण माझे उत्तर एकच असेल. मी नेहमी हिंदू, मुस्लिम मतविभाजनाविरोधात बोलत राहणार. मी धार्मिक आधारावर मतदारांना विभागण्याविरोधात उभी राहीन.