esakal | CRPF जवानांकडून तरुणींचा विनयभंग; ममतांचा गंभीर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

mamta banarjee

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या दबावामुळे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान पश्चिम बंगालमधील मतदारांचा छळ करीत आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी पुन्हा केला.

CRPF जवानांकडून तरुणींचा विनयभंग; ममतांचा गंभीर आरोप

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

कोलकाता- केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या दबावामुळे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान पश्चिम बंगालमधील मतदारांचा छळ करीत आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी पुन्हा केला. जवान तरुण मुलींचा विनयभंग करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्रीय दलाचे जवान पक्षपाती असल्याबाबत ममता यांनी निवडणूक आयोगाकडे यापूर्वीच तक्रार केली आहे. बुधवारी ममता यांनी कुचबिहार जिल्ह्यात प्रचार केला. येथील प्रचारसभेत केलेल्या भाषणात त्या म्हणाल्या की, मतदारांच्या मत देण्याच्या मार्गात अडथळे आणले जात आहेत. लोकांना मारहाण केली जात आहे. तसे करण्याच्या सूचना त्यांना शहा यांनीच दिल्या आहेत. राज्यात किमान दहा जण मारले गेल्याचा आरोप त्यांनी केला. 'निवडणुकीचे प्रशासन आयोगाकडे आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कुणीही मारले जाणार नाही यादृष्टीने आयोगाने कृपा करून खबरदारी घ्यावी. राज्यात तैनात करण्यात आलेल्या सीआरपीएफ जवानांवर लक्ष ठेवावे अशी विनंती मी तुम्हाला करते. महिला मतदारांना जवानांनी त्रस्त करू नये', असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. 

#StopAsianHate: ओळख लपवून रिहाना आंदोलनात, पाहा व्हिडिओ

देशात चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पुन्हा सत्तेत येण्याची संधी आहे. पण, यावेळी भाजपने त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलंय. भाजप आणि तृणमूल राज्यात जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभा घेतल्या आहेत. बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुका होत आहेत. तीन टप्प्यातील मतदान पार पडले असून यादरम्यान हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी सीआरपीएफ जवानांवर गंभीर आरोप केले आहेत. जवानांचा मी आदर करते, पण काही सीआरपीएफ जवान अमित शहा यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवाय काही सीआरपीएफ जवानांनी तरुणींचा विनयभंग केल्याच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. बॅनर्जी यांनी  निवडणूक आयोगाला याप्रकरणी लक्ष देण्यास सांगितलं आहे. 

जवानाच्या सुटकेसाठी मागणी; व्हायरल फोटोसोबत नक्षलवाद्यांनी दिलंय निवेदन

दुसरीकडे, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या त्यांच्या प्रचारसभांमधून भाजप समर्थकांना धमकावत असल्याचा आरोप करीत त्यांनी केलेल्या विधानाबद्दल भाजपने निवडणूक आयोगाकडे (ता.३० मार्च) तक्रार नोंदविली होती. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात भाजपने म्हटले आहे की, आयोगाने सर्व खबरदारी घेतली असली तरी तृणमूल काँग्रेस पक्षप्रमुखांच्या अशा वक्तव्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे. ममता बॅनर्जी यांच्याविरोधातील दाव्याच्या पुष्टीसाठी भाजपने मुख्यमंत्र्यांची नंदीग्राम येथे (ता. २९ मार्च) झालेल्या सभेचा उल्लेख केला. या सभेचे व्हिडिओ चित्रण व्हायरल झाले. सभेत बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, केंद्रीय निमलष्करी दल बंगालमधून एक दिवस निघून जाईल, पण मी कायम राहीन.  
 

loading image