esakal | Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममतादीदी; भाजपची मुसंडी

बोलून बातमी शोधा

narendra modi

Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममतादीदी; भाजपची मुसंडी

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

कोलकाता- पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे 8 टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आठव्या टप्प्यात 76 टक्के मतदान झाले. त्यामुळे आता बंगालमधील एक्झिट पोल हाती येऊ लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. भाजपने पश्चिम बंगालमध्ये चांगलाच जोर लावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी बंगालमध्ये प्रचाराचा धडाका लावला होता. दुसरीकडे, ममता बॅनर्जी यांना पुन्हा सत्तेत येण्याची संधी आहे. बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा असून बहुमतासाठी 148 जागांची आवश्यकता आहे.

Times Now-C-Voter.

Times Now सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार, पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रसला 158 जागा मिळतील, 2016 च्या तुलनेत 53 जागा टीएमसीच्या कमी होतील. भाजपने पश्चिम बंगालमध्ये मोठी मुसंडी मारली असून प्रमुख विरोक्षी पक्ष म्हणून समोर येणार आहे. काही काळापूर्वी नाममात्र अस्तित्व असणारी भाजप यावेळी 115 जागा जिंकेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2016 च्या निवडणुकीत भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस आणि डाव्यांना 22 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: Exit Polls In Assam: भाजपचाच वरचष्मा; सत्ता राखणार; असे आहेत आकडे

CNN News18

CNN News18 च्या एक्झिट पोलनुसार, तृणमूल काँग्रेसला 162, भाजपला 115 तर काँग्रेस-डाव्यांच्या आघाडीला 15 जागा मिळण्याता अंदाज वर्तवण्यात आलाय.

Republic TV-CNX

Republic TV-CNX च्या एक्झिट पोलनुसार, तृणमूल काँग्रेसला 128-138, भाजपला 138-148 तर काँग्रेस-डाव्यांच्या आघाडीला 11-21 जागा मिळण्याता अंदाज वर्तवण्यात आलाय.

ETG Research

ETG Research च्या एक्झिट पोलनुसार, तृणमूल काँग्रेसला 164-176, भाजपला 105-115 तर काँग्रेस-डाव्यांच्या आघाडीला 10-15 जागा मिळण्याता अंदाज वर्तवण्यात आलाय.

P-MARQ

P-MARQ च्या एक्झिट पोलनुसार, तृणमूल काँग्रेसला 152-172, भाजपला 112-132 तर काँग्रेस-डाव्यांच्या आघाडीला 10-20 जागा मिळण्याता अंदाज वर्तवण्यात आलाय.