घटनेनं दिलेली मतदानाची ताकद ममतांदीदींनी हिसकावली - पंतप्रधान मोदी

pm modi
pm modi

खड्गपूर - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षावर निशाणा साधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खड्गपूरमध्ये शनिवारी झालेल्या सभेत राज्यातील पोलिस आणि प्रशासकीय सेवेवरही अप्रत्यक्ष टीका केली.  या दोन्ही व्यवस्थांना राज्यघटनेच्या मर्यादेची आठवण करून देत मोदी म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेने प्रत्येक भारतीयाला मतदानाचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु बंगालमध्ये मतदानाची तुमची ताकद ममतादीदी हिसकावून घेत आहे. २०१८मधील पंचायत निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी ज्याप्रकारे तुमच्या अधिकार पायदळी तुडवले, ते सर्व जग पाहत आहे. मोदी म्हणाले, ‘‘ तृणमूल काँग्रेस सरकारने युवकांची दहा वर्षे वाया घालविली. या काळात सरकारने जे काम केले, त्याने राज्यातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी हिरावल्या. ‘तृणमूल’च्या वसुलीखोर, एकाधिकारशाहीमुळे अनेक जुने उद्योग बंद पडले आणि केवळ माफिया उद्योग राज्यात सुरू करण्यात आला.

बंगालमध्ये विकास ‘डाउन’ 
जगभरात अनेक ठिकाणी व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्राम काल रात्री काही काळ बंद होते, याचा संदर्भ भाषणात करीत उपस्थितांना उद्देशून मोदी म्हणाले की सोशल मीडिया ५०-५५ मिनिटे डाउन होता तरी सर्वजण चिंतेत होते, येथे तर विकास, विश्‍वास आणि स्वप्ने ‘डाउन’ आहे. अशा वेळी बदल घडवून आणण्याची तुमची अधीरता समजू शकतो.

पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र
ममतादीदींचा पक्ष क्रूरतेची शाळा आहे. तिचा अभ्यासक्रम सौदेबाजी, एकाधिकारशाही व लोकांना त्रास देणे हा आहे
पश्‍चिम बंगालमध्ये ‘भाईपो विंडो’तून गेल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही
‘पीएम स्वनिधी’, ‘हर घर जल’चा निधी सरकारी तिजोरीत दीदींनी ठेवला आहे. दीदी, मोदींना श्रेय द्यायचे नव्हते तर देऊ नका, पण गरिबांच्या पोटावर पाय का ठेवलात?
जनता दीदींना दहा वर्षांचा हिशेब मागत आहे. अम्फान चक्रीवादळाचा हिशेब मागितला तर दीदींना राग येतो, अन्नधान्य चोरीबद्दल सवाल केला तर तुरुंगात टाकले जाते, कोळसा गैरव्यवहाबद्दल विचारले तर पोलिस दंडुके मारतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com