esakal | दहशतवाद्यांना न घाबरणाऱ्या जवानांना दीदींचे गुंड काय घाबरवतील? PM मोदींचा हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

pm modi main.jpg

आपला पराभव समोर पाहून दीदींचा माझ्यावरील राग वाढत चालला आहे. बंगालच्या लोकांचा माझ्यावरील स्नेह पाहून त्या बंगालच्या लोकांवरही नाराज आहेत.

दहशतवाद्यांना न घाबरणाऱ्या जवानांना दीदींचे गुंड काय घाबरवतील? PM मोदींचा हल्लाबोल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोलकाता- West Bengal Assembly Election 2021 पश्चिम बंगालमध्ये आज चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. याचदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिलीगुडी येथील एका प्रचारसभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आहे. बंगालमध्ये भाजपचा विजय दिसून येत आहे. दीदी आणि त्यांचे गुंड चिडले आहेत. दीदी, देशातील शूर, धाडसी जवान दहशतवाद्यांना घाबरत नाहीत, तुम्ही पाळलेल्या गुंडांना आणि त्यांच्या धमकींना ते का घाबरतील ? हा उत्तर बंगाल, आपला गोरखा समाज राष्ट्राच्या रक्षणासाठी नेहमी पुढे असतो. त्यांचा मोठा अपमान दीदी करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. पुढे त्यांनी म्हटले की, उत्तर बंगाल भारत मातेच्या गळ्यातील एक अशी भव्य माळ आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या भाषा, जाती, विविध समुदायाचे लोक विविध फुलांमध्ये गुंफले गेले आहेत. इथे एक भारत-श्रेष्ठ भारताचे सुंदर छायाचित्र दिसते. 

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी बंगालमध्ये नवीन वर्ष सुरु होणार आहे, त्याच्या शुभेच्छा दिल्या. नवीन वर्षात वाईटावर चांगुलपणाचा विजय होत आहे. भाजपचा विजय होत आहे. यावेळी त्यांनी कुचबिहारमध्ये मृत पावलेल्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या. त्यांनी निवडणूक आयोगाला कडक कारवाई करण्याची विनंतीही केली. 

हेही वाचा- बंगालमध्ये मोदी लोकप्रिय नेते तर ममतांविरोधात लाट; प्रशांत किशोर यांची ऑडिओ क्लिप लीक

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे 

- आपला पराभव समोर पाहून दीदींचा माझ्यावरील राग वाढत चालला आहे. बंगालच्या लोकांचा माझ्यावरील स्नेह पाहून त्या बंगालच्या लोकांवरही नाराज आहेत. दहा वर्षांपासून गरीबांना त्रास देणाऱ्या गुंडांवर, मारेकऱ्यांवर, टोळीबाजांवर दीदींनी राग व्यक्त केला नाही. परंतु, दीदी त्या सुरक्षा दलांवर राग व्यक्त करत आहेत, जे बंगालच्या लोकांच्या अधिकारांचे रक्षण करत आहेत. 

- दीदी आणि तृणमूलच्या नेत्यांचे विचार काय आहेत, हे आता समोर येत आहे. एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दीदीच्या जवळच्या नेत्याने अनुसूचित जातीच्या (एससी) लोकांचा मोठा अपमान केला आहे. बंगालमधील अनुसूचित जाती, एसटी समाजातील लोक भिकाऱ्यांप्रमाणे वर्तणूक करत आहेत, असे या नेत्याने म्हटले होते. 

- बंगालचे लोक तुमची जहागीरदारी नाही. त्यामुळे बंगालच्या लोकांनी ठरवले आहे की, तुम्हाला जावेच लागेल. तुम्हाला काढूनच बंगालची जनता श्वास घेईन. तुम्ही एकटे जाणार नाहीत. जनता तुमची संपूर्ण टोळी हटवेल. 

हेही वाचा- केंद्र पाकिस्तानला लस पाठविणार; काँग्रेस, आपचा हल्लाबोल

- मी एक व्हिडिओ पाहिला. यात दीदीचे निकटवर्तीय, बंगालचे पर्यटन मंत्री आणि इथले जवळचे आमदार लोकांना घाबरवत होते. ते म्हणाले की, भाजपला मत दिले तर लोकांना येथून बाहेर फेकले जाईल. सर्व कॅमेऱ्यात कैद आहे. ही गुंडगिरी खुलेआमर सुरु आहे. हीच दीदींच्या 10 वर्षांच्या सत्तेचे सत्य आहे. 

loading image