esakal | नंदीग्राममध्ये पराभवानंतर ममतांना आणखी एक धक्का; EC ने मागणी फेटाळली
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata Banarjee

नंदीग्राममध्ये पराभवानंतर ममतांना आणखी एक धक्का; EC ने मागणी फेटाळली

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नवी दिल्ली - पश्चिम बंगालंमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. मात्र ममता बॅनर्जींना नंदीग्राममध्ये भाजपच्या सुवेंदु अधिकारी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. या निकालावरून बराच गोंधळ झाला. सुरुवातीला ममता बॅनर्जींचा विजय झाल्याचं वृत्त आलं होतं मात्र नंतर सुवेंदु अधिकारी यांचा विजय झाल्याचं समोर आलं. निवडणूक आयोगाने रात्री उशिरा सुवेंदु अधिकारी यांचा विजय झाल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान, यावरून आता वाद निर्माण झाला आहे. दुसरीकडे नंदीग्राममध्ये पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली. मात्र निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसची ही मागणी फेटाळून लावल्यानं ममता बॅनर्जींना धक्का बसला आहे.

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा 1736 मतांनी पराभव झाला. यानंतर तृणमूल काँग्रेसने मतमोजणी प्रक्रियेत फेरफार केल्याचा आरोप निवडणूक आयोगावर केला. याप्रकरणी आम्ही न्यायालयात जाऊ असंही ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. मला निकाल मान्य आहे, पण आपण कोर्टात जाणार असल्याचं ममता म्हणाल्या आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर काही फेरफार करण्यात आल्याचा आरोप करत सत्य शोधणार असल्याचं ममता म्हणाल्या आहेत.

हेही वाचा: बंगाली अस्मितेचा विजय; कोणत्या मुद्द्यांनी तारले?

नंदीग्रामबाबत काळजी करु नका. मी नंदीग्राममधून लढले कारण ही एक चळवळ होती. ठीक आहे. नंदीग्रामच्या लोकांना जो काही निर्णय द्यायचा आहे देऊ द्या. मला मान्य आहे. मला फरक पडत नाही. पण आम्ही जिंकलो आहोत आणि भाजपचा मोठा पराभव झाला आहे, असं ते ममता म्हणाल्या आहेत. भाजपने घाणेरडं राजकारण केलं. भाजप हरली आहे. निवडणूक आयोगाचे एकांगीपणा आम्हाला सहन करावा लागला, असंही त्या म्हणाल्या.

loading image
go to top