esakal | West Bengal Election: भाजपचे 4 दिग्गज पिछाडीवर

बोलून बातमी शोधा

bjp candidate
West Bengal Election: भाजपचे 3 दिग्गज पिछाडीवर
sakal_logo
By
कार्तिक पुजारी

कोलकाता- पश्चिम बंगालसह देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होत आहे. बंगालमध्ये भाजपने 200 पारचा नारा दिला असला तरी 100 जागांच्या आसपास जाताना दिसत आहे. दुसरीकडे टीमसी 190 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. बंगालमध्ये 292 जागांवर मतदान झाल्याने बहुमतासाठी 147 जागांची आवश्यकता आहे. अशा स्थितीत टीएमसी सहज बहुमत प्राप्त करताना दिसत आहे. विशेष म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी सध्या पिछाडीवर आहे. कधीकाळी त्यांचे सहकारी आणि भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी 8 हजार मतांची आघाडी घेतली आहे.

तृणमूल आणि भाजपचे दिग्गज नेतेही पिछाडीवर पडताना दिसत आहेत. भाजपची हवा निर्माण करण्यासाठी राज्यसभा खासदार राहिलेले स्वप्न दासगुप्ता तारकेश्वर जागेतून पिछाडीवर आहेत. सुरुवातीच्या कलानुसार ते 3 हजार मतांनी मागे आहेत. त्यांच्यासमोर तृणमूल काँग्रेसचे रामेंदु सिंहाराय यांनी आव्हान उभे केले आहे.

हेही वाचा: Live: बंगालचा कौल ममतांकडे; भाजपलाही घवघवीत यश

भाजपच्या नेत्या लॉकेट चॅटर्जी सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर आहेत. चुनचुरा विधानसभा मतदारसंघात त्यांच्यासमोर तृणमूलच्या असित मजूमदार यांनी आव्हान उभं केलंय. त्यांच्याशिवाय भाजपचे केंद्रीय मंत्री आणि बंगाल सिनेसृष्टीतील मोठं नाव असलेले बाबुल सुप्रियो टॉलीगंज जागेवर पिछाडीवर आहेत. त्यांची तृणमूल काँग्रेसचे अरुप बिस्वास यांच्यासोबत लढत होत आहे. अरुप बिस्वास सध्या सुप्रियो यांच्यापेक्षा 9 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

हेही वाचा: Live : केरळ, आसाम आणि पुदुच्चेरीत कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?

दोन वेळा भाजप खासदार होते बाबुल सुप्रियो

बाबुल सुप्रियो एक लोकप्रिय गायक राहिले आहेत आणि ते सलग दोनवेळा भाजपच्या तिकीटावर संसदेत निवडुन गेलेत. असे असताना भाजपने त्यांना विधानसभेसाठी मैदानात उतरवले आहे. दुसरीकडे ममतांनीही अनेक सिने कलाकारांना तिकीट दिलं आहे. त्यांच्याकडून अपेक्षित निकालाची त्यांना आशा आहे.