बंगालला बांगलादेश करण्याचा कट; नंदीग्राममध्ये सुवेंदुंवर हल्ल्यानंतर भाजपची प्रतिक्रिया

suvendu adhikari
suvendu adhikari

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Assembly Election 2021) दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. यामध्ये नंदीग्राममधील हाय व्होल्टेज लढतीचाही समावेश आहे. इथं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्याविरोधात भाजप प्रवेश केलेले सुवेंदु अधिकारी (Subhendu Adhikari)मैदानात उतरले आहेत. नंदीग्राममध्ये शुभेंदु यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. नंदीग्राम विधानसभा मतदार संघातील एका बूथवर ते गेले होते. तिथून परतत असताना त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात सुवेंदु अधिकारी किंवा त्यांच्या कारला काही नुकसान झालेलं नाही. मात्र इतर गाड्यांचं नुकसान झालं आहे. या हल्ल्यावरून सुवेंदु अधिकारी यांनी सांगितलं की, एका विशिष्ट गटाकडून मला टार्गेट करण्यात आलं. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी सांगितलं की, देशातील कोणत्याही राज्यात अशा प्रकारची हिंसा होत नाही. बंगालला बांगलादेश करण्याचा कट रचला जात आहे. एका विशिष्ट समाजाला पुढे करून तृणमूलकडून राजकीय हिंसाचार करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. दिलीप घोष म्हणाले की, ही लढाई आता आर या पार अशी आहे. यावेळी तृणमूलचा सुफडा साफ होईल. 

सुवेंदु अधिकारी यांनीही या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये जंगलराज सुरु आहे. जय बांग्ला अशा घोषणा दिल्या जात आहेत. ही घोषणा बंगालची नाही तर बांगलादेशची आहे. पश्चिम बंगालला बांगलादेश करण्याती तयारी सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील केशपूर विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार प्रीतिश रंजन यांच्याही ताफ्यावर हल्ला झाल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, तृणमूलमध्ये सहभागी झालेल्या यशवंत सिन्हा यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं की, आज ज्या 30 जागांवर मतदान सुरु आहे त्यावर आता अमित शहांच्या भविष्यवाणीची वाट बघत आहे. भाजप इथं 30 पैकी 35 किंवा 40 जागा जिंकेल का? तिसऱ्या टप्प्यानंतरही ते सांगू शकतील की, भाजप सत्तेत येत आहे आणि पुढं निवडणुका करण्याची गरजच काय? निवडणूक आयोगसुद्धा त्यांच्याशी सहमत असेल असाही उपरोधिक टोला त्यांनी लगावला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com