बंगालच्या वाघिणीला महाराष्ट्राच्या 'वाघाची मदत'! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray and mamta banarjee.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. या पाच राज्यांपैकी पश्चिम बंगालमधील निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

बंगालच्या वाघिणीला महाराष्ट्राच्या 'वाघाची मदत'!

नवी दिल्ली- West Bengal Assembly Elections पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. या पाच राज्यांपैकी पश्चिम बंगालमधील निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. कारण याठिकाणी भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये  (Trinamool Congress) 'काटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे. सत्तेत असलेल्या ममता बँनर्जी  (Mamata Banerjee) यांना भारतीय जनता पार्टीकडून (BJP) कडवे आव्हान मिळाले आहेत. राष्ट्रीय जनता दल आणि समाजवादी पार्टीने भाजपविरोधात समर्थन देत असल्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे शिवसेनेने पश्चिम बंगालच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा (Shivsena) उमेदवार उभा करणार नसल्याचं खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी जाहीर केले आहे. शिवसेना काही काळापूर्वी एनडीएचा एक भाग होती. 

संजय राऊत यांनी ट्विट करुन यासंबंधीची माहिती दिली आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत की, अनेकांना उत्सुकता आहे की पश्चिम बंगालमध्ये शिवसेना निवडणूक लढवेल का नाही? यासंबंधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा कली आहे. सध्याची परिस्थिती पाहता असं वाटतंय की दीदी vs ऑल अशी ही फाईट होणार आहे. ऑल M's याचा अर्थ मनी, मसल आणि मीडिया याचा वापर ममतादीदींच्या विरोधात केला जात आहेत. यामुळे शिवसेनेनं पश्चिम बंगालमध्ये निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच निवडणुकीत आम्ही ममताजींच्या सोबत उभे राहणार आहोत. संजय राऊत म्हणाले की, आमचा विश्वास आहे की ममता बॅनर्जी या खऱ्या बंगाल टायगरेस आहेत. 

जयललितांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या शशीकला आहेत तरी कोण?

असा काळ होता जेव्हा शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणुका लढायचे, पण आता स्थिती बदलली आहे. शिवसेनेने एनडीएची साथ सोडली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे शिवसेना भाजपचा कट्ट्रर विरोधक झाला असून त्याच्याविरोधातील पक्षाला पाठिंबा देताना दिसत आहे. 

आमच्या पुण्यात सगळंच भारी; राहण्यासाठी हे उत्तम शहर

दरम्यान, पुढील काही महिन्यात तमिळनाडू, केरळ, पुदुचेरी, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पश्चिम बंगालमधील लढत चुरशीची होण्याचे संकेत आहेत. मात्र, ओपेनियन पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममतादीदी सरकार स्थापन करतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Web Title: West Bengal Assembly Elections Shivsena Sanjay Raut Bjp Mamta Banarjee

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top