कोळसा घोटाळ्याप्रकरणी CBI ची मोठी कारवाई, कायदामंत्री मलय घटक यांच्या घरावर छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

West Bengal Coal Scam Malay Ghatak

केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी मलय घटक यांच्या घराला चारही बाजूंनी घेरलं आहे.

कोळसा घोटाळ्याप्रकरणी CBI ची मोठी कारवाई, कायदामंत्री मलय घटक यांच्या घरावर छापा

West Bengal Coal Scam : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) ममता सरकारमधील (Mamata Government) कायदामंत्री मलय घटक (Malay Ghatak) यांच्या तीन ठिकाणांवर सीबीआयनं (CBI) छापे टाकले आहेत. कोळसा वाटप घोटाळ्याप्रकरणी (Coal Scam) हा छापा टाकण्यात आलाय.

सीबीआयचं पथक आसनसोलला पोहोचलं असून केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी मलय घटक यांच्या घराला चारही बाजूंनी घेरलं असल्याची माहिती मिळत आहे. कोलकात्यासह सुमारे सात ठिकाणी सीबीआयनं छापा टाकला आहे. अंमलबजावणी संचालनालयानं (ED) तपासासंदर्भात मलय घटक यांचीही चौकशी केलीय. मलय घटक हे आसनसोल उत्तर मतदारसंघाचे आमदार आहेत.

हेही वाचा: भारतीय वंशाच्या खासदाराला निष्ठेचं मिळालं फळ, ब्रिटनच्या गृहमंत्रीपदी Suella Braverman यांची वर्णी

कोळशाचं बेकायदेशीरपणे उत्खनन

कोळसा घोटाळ्यात घटक यांची काही भूमिका होती का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न दोन्ही तपास यंत्रणा करत आहेत. या प्रकरणात ईडी मनी लाँड्रिंग आणि सीबीआय गुन्हेगारी पैलूंचा तपास करत आहे. आसनसोलजवळील कुनुस्टोरिया आणि कजोरा भागातील इस्टर्न कोलफिल्डच्या भाडेतत्त्वावरील खाणींमधून कोळशाची बेकायदेशीरपणे उत्खनन करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

हेही वाचा: भारत एकसंध, राहुल गांधींनी पाकिस्तानात 'भारत जोडो यात्रा' करावी : CM हिमंता सरमा

कोळशाची काळ्या बाजारात विक्री

पश्चिम बंगालमधील कोळसा घोटाळा प्रकरणाचा तपास सीबीआय आणि ईडी या दोन्ही संस्था करत आहेत. ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड बंगालच्या पश्चिम भागात अनेक खाणी चालवते. अनेक वर्षांपासून अवैधरित्या उत्खनन केलेला कोळसा काळ्या बाजारात विकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी केंद्रीय यंत्रणांनी अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांचीही चौकशी केलीय.

Web Title: West Bengal Big Action In Coal Allocation Case Cbi Raids On Mamata Government Law Minister Malay Ghatak

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..