esakal | घराजवळ दुसऱ्यांदा स्फोट; तृणमूलने हल्ला केल्याचा भाजपचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

घराजवळ दुसऱ्यांदा स्फोट; तृणमूलने हल्ला केल्याचा भाजपचा दावा

घराजवळ दुसऱ्यांदा स्फोट; तृणमूलने हल्ला केल्याचा भाजपचा दावा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकता : बराकपूर येथील भाजप खासदार अर्जुन सिंह यांनी घराजवळ दुसऱ्यांदा स्फोट झाल्याचा दावा केला आहे. याआधी आठ सप्टेंबर रोजी त्यांच्या घरासमोर किमान तीन गावठी बॉम्ब फेकण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आपल्यावर दबाव टाकण्यासाठी आणखी हल्ले केले जात आहेत, असा आरोप अर्जुन यांनी केला.

हेही वाचा: 'बरादर अभी जिंदा है!' तालिबाननं जारी केला जिवंत असल्याचा पुरावा

हेही वाचा: कोरोना लसीच्या बूस्टर डोसची सध्या आवश्यकता नाही - Lancet Report

एनआयएकडे चौकशीचे सूत्रे गेल्यानंतर २४ तासांच्या आत उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील जगदल येथील अर्जुन यांच्या घरामागे २०० मीटर अंतरावरील मोकळ्या जागेत सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्फोटाचे आवाज ऐकू आले.

तृणमूलवर आरोप

अर्जुन यांनी या हल्ल्याबद्दल सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले आहे. तृणमूल आणि पश्चिम बंगाल पोलिसांकडून अभय मिळत असल्याने गुन्हेगारांना भीती वाटत नाही. ते मोकाट फिरतात. पोलिस हे तर तृणमूलचे दादा बनले आहेत. मला अशा हल्ल्यांची कधीही भीती वाटत नाही आणि मी घाबरणार नाही. तृणमूलचे नेते पार्थ भौमिक यांनी हा आरोप फेटाळून लावला. अर्जुन आणि त्यांच्या लोकांनीच हा कट आखल्याचा दावा त्यांनी केला.

पोलिसांचे म्हणणे

पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. बॉम्ब फेकण्यात आले नाहीत, तर ते जेथे ठेवले होते तेथे फुटले असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

loading image
go to top