esakal | 'बरादर अभी जिंदा है!' तालिबाननं जारी केला जिवंत असल्याचा पुरावा
sakal

बोलून बातमी शोधा

'बरादर अभी जिंदा है!' तालिबाननं जारी केला जिवंत असल्याचा पुरावा

'बरादर अभी जिंदा है!' तालिबाननं जारी केला जिवंत असल्याचा पुरावा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : तालिबानचा नेता मुल्ला अब्दुल गनी बरादर याचा मृत्यू झाला असल्याची बातमी पसरली होती. मात्र, या बातम्या खोट्या असल्याचा दावा तालिबानने केला आहे. तालिबानने यासाठी त्याचा एक ऑडिओ संदेश देकील जारी केला आहे. तालिबानकडून जारी करण्यात आलेल्या ऑडिओ संदेशमध्ये बरादरने म्हटलंय की, तो पूर्णपणे ठीक आहे आणि तो जखमी वगैरे झाला नाहीये. तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद नईम यांनी ट्विट करत हा संदेश जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, तालिबानमध्ये सत्तेसाठी अंतर्गत संघर्ष सुरु झाला आहे. तसेच या अंतर्गत संघर्षात मुल्ला बरादर जखमी झाले आहेत. मात्र, तालिबानने आता ऑडिओ पोस्ट करत याचं खंडन केलं आहे. मात्र, हा ऑडिओ खरा की खोटा याबाबत मात्र कसलीही पुष्टी अद्याप होऊ शकली नाहीये.

हेही वाचा: चीनच्या फुजियान प्रांतातील शहर लॉकडाऊन; डेल्टा व्हेरियंटची भीती

तालिबानचे प्रवक्ता सुहैल शाहीन यांनी ट्विट करत म्हटलंय की, अफगाणिस्तान इस्लामिक अमीरातचे डेप्युटी पंतप्रधान मुल्ला बरादर अखुंद यांनी ऑडिओ संदेशात जखमी अथवा मृत झालेल्या अफवांचं खंडन केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, या बातम्या खोट्या आणि निराधार आहेत.

हेही वाचा: "...वह योगी कैसा?" राहुल गांधींनी थेट साधला योगींवर निशाणा

तालिबानमधील क्रमांक दोनचा प्रमुख

गेल्या आठवड्यात तालिबानने नव्या सरकारची घोषणा केली होती. या सरकारमध्ये बरादरला क्रमांक दोनचं स्थान दिलं गेलं होतं. काही दिवसांपूर्वी अब्दुल गनी बरादरचं नाव सरकारमधील सर्वांत वरिष्ठ नेता म्हणून पाहिलं जात होतं. मात्र, सध्या त्याचं स्थान क्रमांक दोनचं ठेवण्यात आलं आहे.

loading image
go to top