कोकेन प्रकरणः भाजप नेत्या पामेलांनी घेतलं कैलाश विजयवर्गीयांच्या सहकाऱ्याचे नाव

सकाळ ऑनलाइन टीम
Sunday, 21 February 2021

बंगाल भाजयुमोच्या सरचिटणीस पामेला गोस्वामी यांच्या पर्स आणि कारच्या सीटखाली लाखो रुपये मूल्य असलेले कोकेन सापडले होते. याप्रकरणी त्यांना लगेच अटक करण्यात आली होती. पामेला यांच्याबरोबर त्यांचे पक्षातील सहकारी प्रबीर डे होते. त्यांनाही अटक करण्यात आली आहे. 

कोलकाता- पश्चिम बंगाल भाजयुमोच्या सरचिटणीस पामेला गोस्वामींना 100 ग्रॅम कोकेन बाळगल्याप्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात आली. आता या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. अटकेत असलेल्या पामेला गोस्वामींनी आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या एका सहकाऱ्याचे नाव घेतले आहे. शनिवारी पामेला गोस्वामी यांना पोलिसांनी न्यायालयात सादर करण्यासाठी आणले असता गाडीतून उतरताना त्यांनी पत्रकारांवर ओरडण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी ड्रग्ज प्रकरणात कैलाश विजयवर्गीय यांचे सहकारी राकेश सिहं यांचा समावेश असल्याचे जोरजोरात सांगितले. 

राकेश सिंहनेच आपल्या विरोधात कट रचला असल्याचा आरोप पामेला गोस्वामी यांनी केला. याप्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणीही पामेला यांनी केली आहे. दरम्यान, कैलाश विजयवर्गीय हे पश्चिम बंगालचे प्रभारी आहेत. लवकरच तिथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. पामेला यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. विजयवर्गीय यांचे सहकारी भाजप नेते राकेश सिंह यांना अटक व्हायला हवी. हा त्यांनीच कट रचला होता, असा आरोप त्यांनी केला. न्यायालयातही पामेला यांनी हेच सांगितले. 

हेही वाचा- कोरोनाचा नवा स्ट्रेन आधीपेक्षाही जास्त धोकादायक, एम्स प्रमुखांनी केलं सावध

कोलकातामध्ये शुक्रवारी सायंकाळी पामेला गोस्वामी यांना 100 ग्रॅम कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. नाटकीय घटनाक्रमात, बंगाल भाजयुमोच्या सरचिटणीस पामेला गोस्वामी यांच्या पर्स आणि कारच्या सीटखाली लाखो रुपये मूल्य असलेले कोकेन सापडले होते. याप्रकरणी त्यांना लगेच अटक करण्यात आली होती. पामेला यांच्याबरोबर त्यांचे पक्षातील सहकारी प्रबीर डे होते. त्यांनाही अटक करण्यात आली आहे. 

पामेला या 2019 मध्ये भाजपत सामील होण्यापूर्वी एअर होस्टेस, एक मॉडेल आणि टीव्ही मालिकांमध्ये अभिनेत्री म्हणूनही काम केलेले आहे. त्यानंतर त्यांना हुगळी जिल्ह्यासाठी युवा मोर्चाचे सरचिटणीस आणि युवा मोर्चा पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: West bengal bjp youth leader pamela goswami names rakesh singh close to kailash vijayvargiya