corona main.jpg
corona main.jpg

कोरोनाचा नवा स्ट्रेन आधीपेक्षाही जास्त धोकादायक, एम्स प्रमुखांनी केलं सावध

नवी दिल्ली- भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन (Corona Virus New Strain) जास्त धोकादायक ठरु शकतो, अशी शक्यता एम्सचे प्रमुख डॉ. रणदिप गुलेरिया यांनी वर्तवली आहे. भारतात कोरोना विषाणू प्रती हर्ड इम्युनिटी होणे एक मिथक आहे. कारण 80 टक्के लोकसंख्येत कोरोना विषाणूप्रती अँटीबॉडी बनले पाहिजेत, जे हर्ड इम्युनिटी अंतर्गत संपूर्ण लोकशाहीच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे, असे डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे. 

डॉ. गुलेरिया म्हणाले की, जर महाराष्ट्रातील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत बोलायचे म्हटले तर, ते जास्त संक्रमक आणि घातक सिद्ध होऊ शकतात. नवा स्ट्रेन कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीला पुन्हा बाधित करु शकतो. अशा लोकांमध्ये अँटी बॉडीज तयार झाल्या असल्या तरी त्यांना बाधा होऊ शकते. दरम्यान, महाराष्ट्रमधील कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी म्हटलं की, राज्यात कोरोनाचे 240 नवीन स्ट्रेन दिसले. मागील आठवड्यापासून महाराष्ट्रात वाढलेली रुग्ण संख्या यामागील महत्त्वाचे कारण असल्याचे मानले जात आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सरकारने सुमारे 3 कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन केले आहे. 

हर्ड इम्यूनिटी तयार होण्याती अडचणींबाबत बोलताना डॉ. गुलेरिया म्हणाले की, कोरोना विषाणूचे नवे म्यूटेशन किंवा स्ट्रेन विषाणूप्रती शरीरात होणाऱ्या प्रतिकारक क्षमतांमधून वाचण्यासाठी स्वतःच रस्ता शोधतात. असे स्ट्रेन लसीच्या माध्यमातून प्रतिकारक क्षमता प्राप्त करणारा किंवा कोरोनातून सावरण्यासाठी अँटीबॉडीज घेणाऱ्या व्यक्तींनाही पुन्हा बाधित करु शकतो. त्यामुळे नागरिकांनी कोविड-19 प्रती पूर्वीपेक्षा जास्त सतर्कता बाळगली पाहिजे. 

महाराष्ट्राशिवाय केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि पंजाबमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सरकार लसीकरणाच्या माध्यमातून कोरोना संक्रमणाची साखळी तोडून हर्ड इम्यूनिटी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. नंतर 50 पेक्षा जास्त वय असलेले किंवा गंभीर आजारी असलेल्या 27 कोटी लोकांना लसी दिली जाईल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com