
पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी बस-ट्रॅक्टर भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू, ३५ जखमी.
सर्व प्रवासी बिहारचे असून, तीर्थयात्रेवरून परतत होते; बस दुर्गापूरकडे जात होती.
बसचा वेग जास्त असल्याने पार्क केलेल्या ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक बसली.
स्वातंत्र्यदिनी पश्चिम बंगालमधील पूर्व बर्दवान जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात घडला. शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १९ वर नाला फेरी घाटाजवळ एका भरधाव खाजगी बसची धडक उभ्या ट्रॅक्टरशी झाली, ज्यामध्ये किमान १० जणांचा मृत्यू झाला. या अपघातात ३५ प्रवासी जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते. त्यामध्ये ५ मुलांचाही समावेश आहे.