esakal | West Bengal - निकालाआधीच आयोगाला चिंता; ममतांच्या सरकारला दिले आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata-Banerjee

भवानीपूरमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी मिळवली आहे. त्यानंतर राज्यभर तृणमूलचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत.

निकालाआधीच आयोगाला चिंता; ममतांच्या सरकारला दिले आदेश

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पश्चिम बंगालच्या तीन विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत असून त्याची मतमोजणी सुरु आहे. भवानीपूरमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी मिळवली आहे. त्यानंतर राज्यभर तृणमूलचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत. अद्याप निकाल हाती आलेले नाहीत मात्र त्याआधीच निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल राज्य सरकारला आधेश दिले आहेत. मतमोजणीवेळी निकाल आल्यानतंर किंवा त्यानंतर कोणत्याही प्रकारे जल्लोष करू नये.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाने राज्य सरकारला सांगितलं की, निकालानंतर राज्यात कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही यासाठी योग्य ती पावले उचलावीत. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हे आदेश दिले आहेत. भाजपने तेव्हा तृणमूल काँग्रेसवर हिंचासाचाराचा आरोप केला होता.

हेही वाचा: कोव्हॅक्सिनच्या लहान मुलांवरील चाचणीचा डेटा सोपवला DGCI कडे

भवानीपूरमधून ममता बॅनर्जी या आघाडीवर असून त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे. ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर हा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र विधानसभेवेळी त्यांनी भाजपच्या सुवेंदु अधिकारी यांनी दिलेलं आव्हान स्वीकारत नंदिग्राममधून निवडणूक लढवली होती. तिथं त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर राज्यात सत्ता मिळाली मात्र जागा जिंकता न आल्यानं त्यांचे मुख्यमंत्रीपद अडचणीत आले होते. आता या विजयानंतर त्यांचा मुख्यमंत्रीपदावर कायम राहण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

loading image
go to top