

Calcutta High Court hearing the dispute over the election symbol allotted for the upcoming West Bengal bypolls
esakal
West Bengal Bypolls: पश्चिम बंगालमध्ये ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नंदीग्राम आणि राजनगर पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक चिन्हावरून निर्माण झालेला वाद आता कलकत्ता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. इंडियन सेक्युलर फ्रंटला (ISF) पूर्वी देण्यात आलेले ‘लिफाफा’ हे निवडणूक चिन्ह काढून ते तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाला देण्यात आल्याच्या प्रकरणात न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सोमवारी सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती कृष्णा राव यांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला.