
Mamata Banerjee
Sakal
मिरीक : ‘‘भूस्खलन आणि पुरामुळे घरे उद्ध्वस्त झालेल्या पीडितांना घरे बांधण्यासाठी सरकार मदत करेल, तसेच रस्ते आणि पुलांच्या पुनर्बांधणीसाठीही राज्य सरकार युद्धपातळीवर काम करणार आहे,’’ असे आश्वासन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी दिले. ममता यांनी आज मिरीक येथील पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांना नुकसानभरपाईचे धनादेशही दिले.