ममता मोदींना म्हणतात की, 'तुम्ही भारताचे अँम्बेसिडर की...'

वृत्तसंस्था
शनिवार, 4 जानेवारी 2020

सिलीगुडीतील एका सभेत बोलताना ममता म्हणाल्या की भारताचे पंतप्रधान असलेले मोदी हे नक्की भारताचे अॅम्बेसिडर आहेत की, पाकिस्तानचे?

सिलीगुडी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री नेहमीच पंतप्रधान मोदींवर तोंडसुख घेताना दिसतात. सध्या सीएएविरोधात आंदोलने सुरू असताना, याच बाबत ममतांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. मोदी भारताचे अॅम्बेसिडर आहेत की पाकिस्तानचे असा सवाल करत ममता बॅनर्जींनी मोदींवर टीका केली. 

पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी काँग्रेसला  'हा'  सल्ला दिला

सिलीगुडीतील एका सभेत बोलताना ममता म्हणाल्या की भारताचे पंतप्रधान असलेले मोदी हे नक्की भारताचे अॅम्बेसिडर आहेत की, पाकिस्तानचे? मोदींनी नुकत्याच कर्नाटकात झालेल्या सभेत बोलताना म्हणले होते की, सीएए-एनसीसीविरोधात केंद्र सरकारला विरोध करून घोषणा देण्यापेक्षा पाकिस्तानात होणाऱ्या अत्याचारांवर घोषणा करा. या वक्तव्यावर टीका करत ममता म्हणाल्या की मोदी असे कसे करू शकतात. भारत हा मोठा देश असून त्याला संस्कृती आणि समृद्ध वारसा आहे. त्यामुळे भारताची तुलना पाकिस्तानशी का करता असा सवाल ममतांनी मोदींना केला आहे. तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात की पाकिस्तानचे राजदूत? तुम्ही प्रत्येक मुद्यावर पाकिस्तानच्या नावाचा उच्चार का करता? असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी मोदींना लक्ष्य केले.

लाहोरमधल्या गुरुद्वारा नानकाना साहिबवर जमावाची दगडफेक 

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंत ७० वर्षांनी लोकांना त्यांचे राष्ट्रीयत्न सिद्ध करावे लादत असेल तर त्याच्यासारखी लाजीरवाणी कोणती बाब नाही, असेही त्या म्हणाल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: West Bengal CM Mamata Banerjee criticized PM Narendra Modi at Siligudi