गुरुद्वारा नानकाना साहिबवर जमावाची दगडफेक 

पीटीआय
शनिवार, 4 जानेवारी 2020

शीख मुलीचे धर्मांतर केल्याचा आरोप; भारताची पाकवर टीका 

अमृतसर : गुरू नानकदेव यांचे जन्मस्थान असलेल्या गुरुद्वारा नानकाना साहिबवर स्थानिक मुस्लिम समुदायाने दगडफेक केल्याने वातावरण तणावग्रस्त झाले. भारताने या दगडफेकीचा तीव्र निषेध केला असून, गुरुद्वारा आणि शीख समुदायाच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पाकिस्तान सरकारकडे केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी काँग्रेसला  'हा'  सल्ला दिला

नानकाना साहिब येथील एका मुस्लिम मुलाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये शीख युवतीचे अपहरण करून तिचे बळजबरीने धर्मांतर केल्याचा तिच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. जगजित कौर असे या मुलीचे नाव असून तिच्या घरच्यांनी पोलिस स्थानकात तक्रार नुकतीच नोंदविली होती. त्यांनी व्हिडिओ संदेश प्रसारित करतही हा आरोप केला. याचा राग येऊन मुस्लिम जमावाने गुरुद्वारा नानकाना साहिबवर दगडफेक केली. तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित मुलीच्या कुटुंबातील काही सदस्यांना चौकशीसाठी बोलाविले. याचा निषेध म्हणून या मुस्लिम कुटुंबातील उर्वरित सदस्यांनी आज गुरुद्वाराबाहेरच धरणे आंदोलनाला सुरुवात केली. या घटनेमुळे गुरुद्वाराबाहेर अनेक मुस्लिम नागरिक जमले आणि त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या आणि दगडफेक केली. स्थानिक माध्यमांनी मात्र दगडफेक झाली नाही आणि पोलिस आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली, असे सांगितले. 

धर्माशिवाय राजकारणाला अर्थ नाही : जे. पी. नड्डा

या घटनेनंतर, पाकिस्तानमधील अल्पसंख्य शीख नागरिकांवर हिंसा होत असल्याची टीका भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली तसेच, शीख नागरिकांना अत्यंत पवित्र असलेल्या स्थानावर हल्ला झाला असून, पाकिस्तान सरकारने याबाबत तातडीने पावले उचलणे आवश्‍यक आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनीही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे तक्रार करत चिंता व्यक्त केली. तसेच, गुरुद्वारामध्ये अडकलेल्या नागरिकांची आणि गुरुद्वाराची सुरक्षा करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stone pelting at Nankana Gurudwara at Amritsar