esakal | 'खूब भालो'... दादा-दीदींची ग्रेट भेट!
sakal

बोलून बातमी शोधा

Mamta Banerjee  And Saurav Ganguly

'खूब भालो'... दादा-दीदींची ग्रेट भेट!

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या 49 व्या वाढदिवशी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. क्रिकेटमधील आजी-माजी खेळाडूंसह अन्य क्षेत्रातून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांनी थेट दादाच्या घरी जाऊन त्याला शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ममता दीदी पुष्पगुच्छ घेऊन दादाच्या घरी पोहचल्या होत्या. ही आजच्या दिवसातील एक ग्रेट भेटच होती. सौरव गांगुली आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीचा एक फोटोही समोर आला आहे. हा क्षण 'खूब भालो'...(अति सुंदर) असाच आहे. (West Bengal CM Mamta Banerjee Reached BCCI Chief Saurav Ganguly Residence And Wish 49th Birthday)

ममता दीदी आणि सौरव गांगुली यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या चर्चेत नेमकं काय घडलं हे गुलदस्त्यातच आहे. पण यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण सुटले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र या सर्व अफवाच निघाल्या. ममत बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फेरत पुन्हा एकदा सत्ता खेचून आणली. या भेटीनंतर क्रिकेटचा दादा राजकारणात येणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हेही वाचा: दादाच्या ऑल टाईम इलेव्हनमध्ये पाकिस्तानी क्रिकेटला जागा नाही

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी सौरव गांगुलीला राजकारणामधील एन्ट्रीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी दादाने 'सोबई सोब किछुर जोन्यो होय ना।' असं बंगाली भाषेत उत्तर दिले होते. प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रासाठी बनलेला नसतो असं दादा त्यावेळी म्हटला असला तरी आता पुन्हा राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा: Euro 2020 : डॅनिश गोलीच्या डोळ्यांवर लेझरचा मारा (VIDEO)

दीदी आणि दादाचा 'हम साथ साथ है' वाला हा पहिला सीन नाी

सौरव गांगुली आणि ममता बॅनर्जी यांच्यातील जवळकीचे नाते समोर येण्याची ही पहिली वेळ नाही. जानेवारीमध्ये ज्यावेळी सौरव गांगुली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी रुग्णालयात जाऊन सौरव गांगुली आणि त्याची पत्नी डोना गांगुली यांची भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राजभवनात मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीच्या समारंभासाठी सौरव गांगुली यांना खास निमंत्रण देण्यात आले होते. एवढेच नाही यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी दादाला अकादमासाठी जमीनही दिली होती. पण दादाने ती परत केली होती. भविष्यात काय होईल, याचा अंदाज हा एका भेटीतून निश्चितच लावता येणार नाही. पण या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चेचा धुरळा उडण्यास वाव मिळालाय एवढ निश्चित.

loading image