पश्चिम बंगालचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सोमेन मित्रा यांचे निधन

अशोक गव्हाणे
गुरुवार, 30 जुलै 2020

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष सोमेन मित्रा यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांचे वय ७८ वर्षे होते. काल (ता. २९) बुधवारी रात्री रुग्णालयातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. सोमेन मित्रा हे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते.

कोलकाता : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष सोमेन मित्रा यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांचे वय ७८ वर्षे होते. काल (ता. २९) बुधवारी रात्री रुग्णालयातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. सोमेन मित्रा हे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात आले असता त्यांना रुग्णालयात भरती करून घेण्यात आले होते. काँग्रेस पक्षाचे नेते आणि अखिल भारतिय काँग्रेस समितीचे प्रभारी गौरव गोगोई यांनी सोमेन मित्रा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. गोगोई यांनी ट्विट केले असून त्यांनी म्हटले आहे की, मी लेफ्टिनेंट सोमेन मित्रा यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असून सोमेन हे पश्चिम बंगालमधील एक मोठे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या आयुष्यात अनेक लोकांना त्यांनी सहारा दिला होता. पश्चिम बंगालच्या उभारणीत त्यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही.

दरम्यान, सोमेन मित्रा यांनी १९६०मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९६०च्या दशकामध्ये ते विद्यार्थी नेता होते. विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ११९२ ते १९९६, १९९६ ते १९९८ आणि सप्टेंबर २०१८ पासून आतापर्यंत एकूण तीनवेळा ते पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. तसेच, ते सियालदह या विधानसभा मतदारसंघातून सातवेळा आमदार राहिले आहेत.

त्यांनी २००८ मध्ये प्रगतिशील इंदिरा कांग्रेस नावाचा राजकिय पक्ष बनविाण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस सोडली होती. त्यानंतर २००९च्या लोकसभा निवडणुकांवर लक्ष देत त्यांनी प्रगतिशील इंदिरा काँग्रेस पक्षाचे तृणमूल काँग्रेस पक्षात विलनीकरण केले आणि त्यावर्षी डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली. त्यानंतर मित्रा २०१४मध्ये पुन्हा तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंततर २०१६च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिमबंगालमधील वाम मोर्चा आणि काँग्रेसची आघाडी करण्यात मित्रा यांनी महत्वाची भूमिका निभावली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: West Bengal Congress President Somen Mitra Dies At 78