esakal | West Bengal Election:भाजप तोंडघशी; महिलेने उमेदवारीच नाकारली
sakal

बोलून बातमी शोधा

Shikha Mitra

भाजप, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची बनलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला तोंडघशी पडावं लागलं आहे. भाजपने काल उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. परंतु, या यादीतील उमेदवारांच्या घोषणेवरून राज्यात खळबळ उडाली आहे.

West Bengal Election:भाजप तोंडघशी; महिलेने उमेदवारीच नाकारली

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोलकाता : भाजप, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची बनलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला तोंडघशी पडावं लागलं आहे. भाजपने काल उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. परंतु, या यादीतील उमेदवारांच्या घोषणेवरून राज्यात खळबळ उडाली आहे. एका महिला उमेदवाराने भाजपची उमेदवारीच नाकारली आहे. यावरून भाजपला अतिघाई नडल्याची चर्चा सुरू आहे. तसेच भाजपकडे अनेक ठिकाणी उमेदवारच नसल्याची चर्चा होत आहे. त्यामुळं भाजप ममता बॅनर्जींना कसे आव्हान देणार याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत 148 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात शिखा मित्रा यांचे नाव आहे. मात्र, भाजपने उमेदवारी देण्या संदर्भात कोणतिही चर्चा केली नसल्याचे शिखा मित्रा यांनी म्हटलंय. त्यामुळं त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. शिखा मित्रा यांनी विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केल्यामुळं भाजपवर नामुष्की ओढवली आहे. मुळात शिखा मित्रा या काँग्रेसशी संबंधित आहेत. परंतु, त्या स्वतः  कधीही सक्रीय राजकारणात नव्हत्या. भाजपच्या यादीत नाव आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला असून, निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोण आहेत शिखा मित्रा
भाजपच्या दुसऱ्या यादीत कोलकाता शहरातील काही मतदारसंघांमधील उमेदवारांचा समावेश आहे. त्यात चौरंगी विधानसभा मतदारसंघातून शिखा मित्रा यांच्या नावाची घोषणा झाली. परंतु, उमेदवारीची घोषणा होताच मित्रा यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. शिखा मित्रा या दिवंगत काँग्रेस नेते सोमन मित्रा यांच्या पत्नी आहेत. या संदर्भात शिखा मित्रा यांचे आणि भाजप नेते शुवेंदु अधिकारी यांचे अनेक वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत. काही दिवसांपूर्वी शिखा मित्रा यांनी अधिकारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर शिखा मित्रा भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरतील, अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु, ती केवळ चर्चाच राहिली. 

VIDEO - धावत्या गाडीवर ड्रायव्हरच्या पुश अप्स; हार्ड वर्क केलंस म्हणत पोलिसांकडून 'सत्कार'

काँग्रेस-डावे बाजुलाच 
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक रंगात आली असताना, केवळ भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशी थेट लढत सध्या दिसत आहे. तृणमूल काँग्रेसने अनेक वर्षांची डाव्यांची सत्ता उधळून लावत राज्यात एकतर्फी सत्ता आणली होती. परंतु, आता त्यांना भाजपचं आव्हान आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी राज्यात भाजप तोंडी लावण्यापूरता पक्षही नव्हता. परंतु, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी बंगालमध्ये जोर लावला आहे. कधीही फारसे यश न मिळालेल्या राज्यात सत्तांतर घडवून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या सगळ्यात काँग्रेस आणि डाव्या पक्षांची आघाडी मात्र बाजूलाच पडली आहे. सत्ता संघर्षात दोन्ही पक्षांची चर्चादेखील होत नसल्याचे दिसत आहे.

चार वर्षात एकही दंगल नाही; योगी सरकारचे ‘रिपोर्ट कार्ड’

मी कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढणार नाही. माझ्या अनुमतीशिवाय उमेदवार यादीत माझे नाव देण्यात आले आहे. मी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही. 
- शिखा मित्रा, काँग्रेस नेत्या 

Edited By - Prashant Patil