

Calcutta High Court questions the Election Commission over the allocation of the ‘Envelope’ election symbol for the West Bengal bypoll
esakal
पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या निवडणूक चिन्हाच्या वादावरून कलकत्ता उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाशी संबंधित डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेसला आयोगाने ‘लिफाफा’ हे निवडणूक चिन्ह दिले आहे. मात्र, याच चिन्हाचा वापर मागील निवडणुकीत इंडियन सेक्युलर फ्रंटने (ISF) केला होता. ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी हे चिन्ह देण्यात आल्याने त्यावरून वाद निर्माण झाला आहे.