भारत-बांगलादेश सीमेवर चकमक; BSF नं दोन बांगलादेशींना केलं ठार I India-Bangladesh Border | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BSF

सीमेपलीकडून गुरांची तस्करी करत असताना शुक्रवारी पहाटे भारत-बांगलादेश सीमेवर (India-Bangladesh Border) चकमक झाली.

भारत-बांगलादेश सीमेवर चकमक; BSF नं दोन बांगलादेशींना केलं ठार

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

India-Bangladesh Border : सीमेपलीकडून गुरांची तस्करी करत असताना शुक्रवारी पहाटे भारत-बांगलादेश सीमेवर (India-Bangladesh Border) चकमक झाली. यादरम्यान सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी चकमकीत एका भारतीयासह (India) दोन बांगलादेशींना (Bangladeshi) ठार केले. ही घटना कूचबिहारमधील (Cooch Behar) सेतई सतभंडारी गावात घडलीय. मिळालेल्या माहितीनुसार, 12 नोव्हेंबरला पहाटे 3 वाजता बांगलादेशातून घुसखोर भारतीय हद्दीत घुसले. बांबूच्या साहाय्यानं कँटीलिव्हर बनवून त्याच्या मदतीनं गुरांच्या मुंड्यांची तस्करी (Cattle Smuggling) करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: 2,348 प्रवासी गाढ झोपेत असताना रेल्वे रुळांवर कोसळले मोठे दगड

सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांनी घुसखोरांना माघारी परतण्याचा इशारा दिला. मात्र, घुसखोरांनी जवानांच्या इशाऱ्याकडं दुर्लक्ष करून आपलं काम सुरूच ठेवलं. यानंतर घुसखोरांना रोखण्यासाठी बीएसएफच्या जवानांनी प्राणघातक शस्त्रांचा वापर केला. मात्र, त्यानंतरही घुसखोर परतायला तयार नव्हते. मागे हटण्याऐवजी त्यांनी सैनिकांवरच हल्ला केला. घुसखोरांनी जवानांवर लोखंडी रॉड आणि लाठीनं हल्ला केलाय. दरम्यान, सैनिकांच्या जीवावर बेतल्यानंतर आणि धोका लक्षात येताच, बीएसएफच्या तुकडीनं हल्लेखोरांवर गोळीबार केला.

हेही वाचा: भरपावसात महिला पोलीस निरीक्षकानं बेशुद्ध व्यक्तीला खांद्यावर उचलून नेलं रुग्णालयात

चकमकीत एक बीएसएफ जवान जखमी

गोळीबारानंतर जवानांनी शोधमोहीम सुरू केली. यावेळी त्यांना काटेरी तारांवर दोन अज्ञात घुसखोरांचे मृतदेह आढळून आले. या चकमकीत एक जवानही जखमी झाल्याचे बीएसएफनं सांगितलंय. त्याच्यावर लाठीहल्ला करण्यात आलाय. सध्या त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशा बऱ्याच घटना भारत-बांगलादेश सीमेवर समोर आल्या आहेत, जिथं घुसखोरांनी गुरांची तस्करी करण्याचा प्रयत्न केलाय. यादरम्यान घुसखोर आणि जवानांमध्ये वारंवार चकमक होत आहेत.

loading image
go to top