ममतादीदींसोबत चर्चा? राज्यपाल काय म्हणाले?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

पश्‍चिम बंगालमधील राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात सातत्याने खटके उडत असताना मुख्यमंत्र्यांशी चर्चेस आपण तयार आहोत, अशी प्रतिक्रिया राज्यपाल जगदीप धनकर यांनी आज दिली. विधिमंडळाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना धनकर म्हणाले की, चर्चा आणि संवाद हे पुढे जाण्याचे संविधानिक मार्ग आहेत. राजभवन किंवा राज्याचे सचिवालय अशा कुठल्याही ठिकाणी बसून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची माझी तयारी आहे.

कोलकता - पश्‍चिम बंगालमधील राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात सातत्याने खटके उडत असताना मुख्यमंत्र्यांशी चर्चेस आपण तयार आहोत, अशी प्रतिक्रिया राज्यपाल जगदीप धनकर यांनी आज दिली. विधिमंडळाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना धनकर म्हणाले की, चर्चा आणि संवाद हे पुढे जाण्याचे संविधानिक मार्ग आहेत. राजभवन किंवा राज्याचे सचिवालय अशा कुठल्याही ठिकाणी बसून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची माझी तयारी आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य सरकारशी संवाद ठेवण्याची आपली इच्छा असून, ती आपण अनेकदा बोलून दाखविली आहे, असे ते म्हणाले. धनकर यांनी आज विधिमंडळातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. आपण नियोजित बैठकीत असल्याने स्वागतासाठी उपस्थित राहू शकलो नाही, असे स्पष्टीकरण विधानसभेच्या अध्यक्षांनी दिले होते. धनकर हे गुरुवारी विधिमंडळाला भेट देण्यासाठी आले असताना त्यांच्यासाठीचे प्रवेशद्वारे बंद असल्याचे आढळून आले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर जाणार नाहीत ? काय खरं, काय खोटं?

तसेच, राज्यपालांच्या स्वागतासाठी सभापती आणि विधिमंडळाचे कर्मचारीही अनुपस्थित होते. त्यामुळे धनकर यांना बराच काळ वाट पाहावी लागली होती. त्याबाबत धनकर यांनी संतप्त प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर तोंडसुख घेतले होते. त्यानंतर सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसकडूनही धनकर यांच्यावर आरोप करण्यात आला होता. राज्यपाल राज्याचे प्रशासकीय प्रमुख होण्याचा प्रयत्न करताहेत, असे "तृणमूल'ने म्हटले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: west bengal governor jagdeep dhankhar ready to talk with cm mamata banerjee