Madrasahs Friday Holiday Ends : मदरशांत आता शुक्रवारी नाही तर रविवारी साप्ताहिक सुट्टी, पश्चिम बंगाल सरकारने अनेक वर्षांची परंपरा काढली मोडीत

Sunday Weekly Off : पश्चिम बंगाल मदरसा शिक्षण मंडळाने राज्यातील सर्व मान्यताप्राप्त मदरशांना शुक्रवारीची साप्ताहिक सुट्टी तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. आता रविवार हा या मदरशांचा एकमेव साप्ताहिक सुट्टीचा दिवस असेल.
Madrasahs Friday Holiday Ends : मदरशांत आता शुक्रवारी नाही तर रविवारी साप्ताहिक सुट्टी, पश्चिम बंगाल सरकारने अनेक वर्षांची परंपरा काढली मोडीत
Updated on: 

पश्चिम बंगालमधील मदरशांच्या साप्ताहिक सुट्टीच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. अनेक दशकांपासून सुरू असलेली शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी देण्याची परंपरा आता बंद होणार आहे. पश्चिम बंगाल मदरसा शिक्षण मंडळाने राज्यातील सर्व सरकारी मान्यताप्राप्त मदरशांना शुक्रवारी ऐवजी रविवारी साप्ताहिक सुट्टी पाळण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशानुसार, शुक्रवार हा आता इतर कामकाजाच्या दिवसांप्रमाणे नियमित शैक्षणिक दिवस असेल. हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...