esakal | West Bengal - विजयानंतर ममता बॅनर्जींनी दिली प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

मतदारसंघात प्रत्येक वॉर्डात माझा विजय - ममता बॅनर्जी

विजयासह ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदी कायम राहण्याचा मार्ग मोकाळा झाला आहे.

मतदारसंघात प्रत्येक वॉर्डात माझा विजय - ममता बॅनर्जी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या उमेदवार प्रियांका टिबरेवाल यांना मोठ्या फरकाने पराभूत केले. भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जींनी ५८ हजार ८३२ मतांनी विजय मिळवला. विजयानंतर प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी भवानीपूरमधील प्रत्येक वॉर्डमध्ये विजय मिळवला आहे.

भवानीपूरमध्ये जवळपास ४६ टक्के लोक हे बंगाली नाहीयेत.त्यांनीही मला मत दिलं. पश्चिम बंगालचे भवानीपूरच्या निकालाकडे लक्ष होतं आणि ही माझ्यासाठी प्रेरणादायी बाब असल्याचं ममता बॅनर्जी यांनी विजयानंतर बोलताना सांगितलं.

हेही वाचा: West Bengal - ममता बॅनर्जींची बाजी; भाजपच्या प्रियांका पराभूत

पहिल्या फेरीपासूनच ममता बॅनर्जी या आघाडीवर होती. अखेरीस त्यांनी ५८ हजार ८३२ मतांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदी कायम राहण्याचा मार्ग मोकाळा झाला आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसला या विजयाचा जल्लोष मात्र जोरदार करता येणार नाही. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीवेळी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला विजयाचा जल्लोष न करण्याचे आदेश दिले आहेत.

loading image
go to top