esakal | बंगालमध्ये राजकीय भूकंप? भाजपचे 24 आमदार संपर्कात - TMC
sakal

बोलून बातमी शोधा

mamta banerjee

राज्यात सत्ता तर राखलीच पण भाजपचे आमदारही आपल्या पक्षात घेतायत ममता बॅनर्जी

बंगालमध्ये राजकीय भूकंप? भाजपचे 24 आमदार संपर्कात - TMC

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकाता - भाजप आमदार सौमेन रॉय यांची काही दिवसांपूर्वी तृणमूलमध्ये घरवापसी झाली होती. त्यानंतर आता तृणमूलचे नेते मुकुल रॉय (Mukul Roy) यांनी केलेल्या दाव्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, येत्या काळात भाजपचे (BJP) आणखी काही आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) येऊ शकतात. ममता बॅनर्जींसोबत (Mamta Banarjee) काम करण्याची इच्छा असलेले २४ आमदार माझ्या संपर्कात आहेत. रॉय यांनी सांगितलं की, तृणमूलमध्ये यायचं आहे अशा आमदार आणि नेत्यांची मोठी रांग आहे.

जून महिन्यात मुकुल रॉय यांनी स्वत: भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. मुकुल रॉय चार वर्षांपूर्वी तृणमूलची साथ सोडत भाजपमध्ये गेले होते. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर त्यांनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि पक्षात प्रवेश केला.

गेल्या चार आठवड्यात सौमेन रॉय, विश्वजित दास आणि तन्मय घोष यांच्यासह चार भाजप आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये आले आहेत. हे सर्वच आमदार मुकुल रॉय यांच्या जवळचे मानले जातात आणि २०२१ च्या विधानसभा निवडणुकी आधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

हेही वाचा: 'शिक्षक पर्व'मध्ये PM मोदी करणार संबोधित, मोठ्या घोषणेची शक्यता

सौमेन रॉय यांनी गेल्याच आठवड्यात पार्थ चॅटर्जींच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी ३० ऑगस्टला तन्मय घोष तर ३१ ऑगस्टला विश्वजित दास यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केली. सौमेन रॉय तृणमूलमध्ये आल्यानंतर आता पश्चिम बंगालच्या विधानसभेत भाजप आमदारांची संख्या ७१ झाली आहे.

loading image
go to top