

Ashish Banerjee Found Dead at TMC Office, Police Begin Probe
Esakal
पश्चिम बंगाल विधानसभेचे माजी उपसभापती आणि टीएमसीचे आमदार आशीष बॅनर्जी यांचा पक्षाच्या कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. रामपुरहाटमधील त्यांच्या निवासस्थानी असलेल्या कार्यालयातच संशयास्पद अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आलाय. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आशीष बॅनर्जी हे ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय मानले जात होते.