TMC Leaders Join Congress : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! १०० हून अधिक नेते-कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला; यावेळी भाजप नाही तर कॉंग्रेसमध्ये प्रवेश

TMC Congress : महिश बथानी परिसरातील १०० हून अधिक TMC नेते आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त आहे. यामध्ये १३ पंचायत सदस्य, एक पंचायत समिती सदस्य, प्रादेशिक पक्षाध्यक्ष आणि ब्लॉक उपाध्यक्षांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.
Why TMC Leaders Joined Congress

Why TMC Leaders Joined Congress

esakal

Updated on: 

TMC leaders join Congress in Malda as West Bengal : पश्चिम बंगालमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून तृणमूल काँग्रेसच्या (TMC) ममता बॅनर्जी गटाला मोठा धक्का बसला आहे. मालदा जिल्ह्यातील महिश बथानी परिसरातील तृणमूल काँग्रेसच्या १०० हून अधिक नेते आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये १३ पंचायत सदस्य, एका पंचायत समिती सदस्यासह प्रादेशिक पक्षाध्यक्ष आणि ब्लॉक उपाध्यक्षांचाही समावेश असल्याचे प्रसारमाध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे. राज्यातील दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षांतरामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com