West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Darjeeling Landslide : मिरिक आणि सुखिया भागात अनेक लोक जखमी झाले आहेत; बचाव कार्य सुरू आहे.कालिम्पोंग आणि आसपासच्या भागांतील संपर्क तुटल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त करून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.
West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Updated on

Summary

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात सततच्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
भूस्खलन आणि पूल कोसळण्याच्या घटनांमध्ये आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
दोन लोक बेपत्ता असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.

उत्तर बंगालमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. दार्जिलिंग जिल्ह्यात भूस्खलन आणि पूल कोसळण्याच्या घटनांमध्ये आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि दोघे बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिरिक आणि सुखिया भागात भूस्खलनात अनेक जण जखमी झाले आहेत. या आपत्तीनंतर दार्जिलिंग जिल्हा पोलिस मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. कालिम्पोंगमधील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. सततच्या पावसामुळे अनेक भागात संपर्क तुटला आहे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com