

West Bengal STF
esakal
कोलकता : पोलिसांचे गणवेश मिळवून एक गट जंतरमंतरवरील आंदोलनात न्यायचा आणि तेथे घातपात घडवून आणायचा, असा कट ‘जैशे महंमद’चा हस्तक महंमद हमिम मोंडलने रचला होता, असा गौप्यस्फोट पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष पोलिस दलाने (एसटीएफ) केला आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालमधील राजकीय नेत्यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवत, त्यांच्याकडून गोपनीय माहिती काढण्यासाठीही तो प्रयत्नशील होता, असेही सांगण्यात येत आहे.