Political Controversy
esakal
TMC Leader Abdur Rahim Bakshi Threatens BJP MLA Shankar Ghosh with Acid Attack : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुर रहीम बख्शी यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह विधान केलं आहे. बख्शी यांनी भाजपा आमदार शंकर घोष यांना थेट अॅसिड हल्ल्याची धमकी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बख्शी यांनी अशाप्रकारे धमकी देण्याची ही पहिलीची वेळ नाही. यापूर्वी त्यांनी भाजपा, सीपीआय (एम), आणि काँग्रेसच्या नेत्यांचे हात-पाय तोडण्याची धमकी दिली होती.