हिंदू संघाती मैदानात उतरणार

श्‍यामल रॉय
Tuesday, 16 February 2021

पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आतापासूनच रंग भरत असून हिंदुंची स्वयंसेवी संस्था हिंदू संघातीने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. देबू भट्टाचार्य यांनी जय संघाती पक्षाची घोषणा केली असून बंगालमधील हिंदूंसाठी लढणे हेच मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

कोलकता - पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आतापासूनच रंग भरत असून हिंदुंची स्वयंसेवी संस्था हिंदू संघातीने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. देबू भट्टाचार्य यांनी जय संघाती पक्षाची घोषणा केली असून बंगालमधील हिंदूंसाठी लढणे हेच मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. 

हुगळी जिल्ह्यातील इस्लामिक धर्मोपदेशक अब्बास सिद्दिकी यांनी अलीकडेच सेक्युलर फ्रंट नावाचा पक्ष उतरवण्याचा निर्णय घेतलेला असताना आता आणखी एका पक्षाची भर पडली आहे. हिंदू संघातीकडून उत्तर बंगालमध्ये ४० उमेदवार, दक्षिण बंगालमधून १३० उमेदवार असे एकूण १७० उमेदवार निवडणुकीत उतरणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हिंदू संघातीने भाजपला पाठिंबा दिला होता. एनआरसी आणि सीएए कायद्याची अंमलबजावणी सध्या थंडबस्त्यात असून लोकसंख्या नियंत्रणासाठी कोणताही कायदा आणला जात नसल्याचे भट्टाचार्य म्हणाले. बंगालच्या हिंदूंकडे भाजपचे दुर्लक्ष होत असल्याचाही त्यांनी आरोप केला. काही दिवसांपूर्वी नारदा स्टिंग ऑपरेशन आणि शारदा चीट फंड प्रकरणी आरोपी असलेल्या नेत्यांवर भाजपकडून टीका केली जात होती. मात्र त्यापैकीच काही नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याचे आरोप केला होत आहे. भाजपकडून मात्र या आरोपांना फारसे महत्त्व दिले जात नसल्याचे चित्र आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोग्य सुविधेत लक्षणीय सुधारणा : ममता
केंद्राच्या आरोग्य आणि कृषी योजनेपासून बंगालच्या नागरिकांना वंचित ठेवण्याचा आरोप भाजपकडून ममता बॅनर्जी सरकारवर केला जात असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र राज्यातील आरोग्य यंत्रणेचा विकास झाल्याचे म्हटले आहे. गेल्या काही वर्षांत पश्‍चिम बंगालच्या आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांत लक्षणीय सुधारणा झाली असल्याचे बॅनर्जी यांनी म्हटले आहे. कोलकता येथील चित्तरंजन सेवासदन रुग्णालयात ‘मदर ॲड चाइल्ड हब’चे उदघाटन करताना त्या म्हणाल्या, की राज्यभरातील आरोग्य केंद्र, रुग्णालयात आंतरराष्ट्रीय निकषानुसार बदल करण्यात आले आहेत.

मोदी सरकारची ट्विटरला दणका देण्याची तयारी; KOO अ‍ॅपला मिळणार पसंती

आजघडीला पश्‍चिम बंगालची आरोग्य सेवा देशात सर्वोत्तम आहे. बंगाल सरकारने राज्यातील आरोग्य क्षेत्रात तसेच अन्य आवश्‍यक पायाभूत सुविधांचा विकास केला आहे. एवढेच नाही तर कोविड संकट काळातही राज्याने चांगली कामगिरी केली असल्याचे बॅनर्जी म्हणाल्या. राज्यातील नागरिकांना मोफत धान्य, मोफत आरोग्य सुविधा आणि मोफत शिक्षण देणारे पश्‍चिम बंगाल हे एकमेव राज्य आहे. राज्यातील दहा कोटी नागरिकांना आरोग्य साथी कार्ड देण्यात आले आहे. राज्यात आता १७ ठिकाणी मदर ॲड चाइल्ड हब असून ४३ रुग्णालय मल्टीस्पेशालिटीचे असल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली.

Toolkit Case: खलिस्तानी समर्थकांच्या संपर्कात असलेली निकीता जेकब आहे तरी कोण?

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: West Bengal Vidhansabha Election Hindu Sanghati Politics mamta banerjee