esakal | अभिषेकविरोधात लढून दाखवा : ममता बॅनर्जी
sakal

बोलून बातमी शोधा

mamta banerjee

अमित शहा यांच्यामध्ये हिंमत असेल तर आधी त्यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणूक लढवून ती जिंकून दाखवावी आणि त्यानंतर माझ्याशी लढण्याचा विचार करावा, असे प्रतिपादन पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केले.

अभिषेकविरोधात लढून दाखवा : ममता बॅनर्जी

sakal_logo
By
पीटीआय

पैलन (प.बंगाल) - अमित शहा यांच्यामध्ये हिंमत असेल तर आधी त्यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणूक लढवून ती जिंकून दाखवावी आणि त्यानंतर माझ्याशी लढण्याचा विचार करावा, असे प्रतिपादन पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केले. ‘दक्षिण-२४ परगणा’ जिल्ह्यातील पैलन येथे आयोजित सभेमध्ये त्या बोलत होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ममता म्हणाल्या की, ‘अभिषेकला राज्यसभेवर जाण्याचा सोपा मार्ग निवडता आला असता पण त्याने लोकांमधून निवडून येत लोकसभेवर जाण्याचा निर्णय घेतला. भाजपवाले दिवस आणि रात्र दीदी-पुतण्याबाबत बोलत असतात. मी अमित शहा यांना खुले आव्हान देते, त्यांनी आधी अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणूक लढवावी आणि त्यानंतर माझ्याशी लढण्याचा विचार करावा.’’ 

Video: उशीरा GST भरणाऱ्यांना दिलासा; FM सीतारमण यांची पुण्यातील शिष्टमंडळाकडून भेट

तत्पूर्वी अमित शहा यांनी ममता बॅनर्जींवर घराणेशाहीचा आरोप करताना भविष्यात अभिषेक बॅनर्जी हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा दावा केला होता. शहा यांनी आमच्यावर टीका करण्यापूर्वी त्यांचे चिरंजीव क्रिकेटच्या प्रशासनामध्ये कसे आले आणि आता कोट्यवधी रुपये कसे कमावत आहेत? या प्रश्‍नाचे उत्तर द्यावे अशी विचारणाही त्यांनी केली.

बाहेरून राज्यामध्ये आलेल्या लोकांना विधानसभा निवडणुकीनंतर माघारी परतावे लागेल.
- अभिषेक बॅनर्जी, नेते तृणमूल काँग्रेस

Edited By - Prashant Patil