प. बंगालला हवी स्वतःची लेक

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 21 February 2021

विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी कंबर कसलेल्या तृणमूल काँग्रेसने प्रचाराच्या बाबतीत देखील आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. तृणमूलकडून आगामी निवडणुकीसाठीचे घोषवाक्य आज जाहीर करण्यात आले असून ‘बंगालला हवी स्वतःची लेक ’ अशी हाक पक्षाकडून देण्यात आली आहे.

कोलकता - विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी कंबर कसलेल्या तृणमूल काँग्रेसने प्रचाराच्या बाबतीत देखील आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. तृणमूलकडून आगामी निवडणुकीसाठीचे घोषवाक्य आज जाहीर करण्यात आले असून ‘बंगालला हवी स्वतःची लेक ’ अशी हाक पक्षाकडून देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पक्षाच्या मुख्यालयामधून ही नवी मोहीम सुरू झाली असून कोलकत्याच्या मुख्य रस्त्यांवर देखील ममतादीदींच्या फोटोंसह काही होर्डिंग्ज झळकले आहेत.‘‘ मुख्यमंत्री या नात्याने आतापर्यंत राज्यातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या ममतादीदीच पुन्हा लोकांना हव्या आहेत. बाहेरच्या लोकांचे येथे काही काम नाही.’’ असे तृणमूलचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांनी म्हटले.

झूम मिटिंगमध्ये व्यस्त पतीचं पत्नीनं घेतलं चुंबन; हर्ष गोयंका, आनंद महिंद्रांनीही शेअर केला मजेशीर व्हिडिओ

मोठा फौजफाटा तैनात
निवडणूक आयोगाने देखील पश्‍चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या बारा कंपन्या विविध ठिकाणांवर तैनात करण्यात आल्या आहेत. यातील दोन तुकड्या या विशेष रेल्वेगाडीतून दुर्गापूर येथे पोचल्या. एक तुकडी ही वर्धमान व  अन्य पाच तुकड्या हावड्यातील दानकुंजला रवाना झाल्या. अन्य चार तुकड्या चितपूरला रवाना झाल्या.

लाल किल्ला हिंसाचार : दिल्ली पोलिसांनी जारी केले 20 जणांचे फोटो

तृणमूल काँग्रेस भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.
- राकेश सिंह, नेते भाजप

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: West Bengal Vidhansabha Election Politics mamta banerjee partha chatterjee