झूम मिटिंगमध्ये व्यस्त पतीचं पत्नीनं घेतलं चुंबन; हर्ष गोयंका, आनंद महिंद्रांनीही शेअर केला मजेशीर व्हिडिओ

टीम ई सकाळ
Saturday, 20 February 2021

अनेक मान्यवर व्यक्तींनीही हा व्हिडिओ एन्जॉय केला असून यावर मजेदार प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 

सोशल मीडियात कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. नुकतीच झूम मिटिंगमधील श्वेता नावाच्या मुलीची एक ऑडिओ क्लीप सोशल मीडियात व्हायरल झाली होती. यावर मिम्सचा अक्षरशः पाऊस पडला होता. त्यानंतर अशाच एका झूम मिटिंमध्ये व्यस्त असलेल्या पतीचं पत्नी चुंबन घेण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेक मान्यवर व्यक्तींनीही हा व्हिडिओ एन्जॉय केला असून यावर मजेदार प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 

महागाईचा भडका! नवदाम्पत्याला लग्नात भेट मिळाले कांदे, पेट्रोल, गॅस सिलेंडर

उद्योगपती हर्ष गोयंका यांनी आपल्या टाइमलाइनवरुन हा व्हिडिओ ट्विट केला असून त्याला 'झूम कॉल्स सो फनी' असं कॅप्शन दिलं आहे. तसेच महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी हर्ष गोयंका यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्विट केला आहे. आनंद महिंद्रा या व्हिडिओवर भाष्य करताना "हा... हा... मी व्हिडिओतील या महिलेला 'वाईफ ऑफ दि इयर'साठी नामांकित करतो आणि जर यातील पती अधिक रोमॅन्टिक झाला असता तर या जोडप्यालाच मी 'कपल ऑफ दि इयर'साठी नामांकित केलं असतं," असं म्हटलं आहे. 

भाजपच्या युवा महिला नेत्याला अंमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक

या व्हिडिओमध्ये पती झूम मिटिंगमध्ये विविध विषयांवर बोलण्यात व्यस्त असल्याचं दिसतं. त्याचवेळी त्याची पत्नी रुममध्ये येते आणि तत्काळ आपल्या पतीला किस करण्याचा प्रयत्न करते, झूम मिटिंगदरम्यान पत्नीच्या या अचानक झालेल्या कृत्यानं नवरा काहीसा गोंधळतो आणि पुन्हा आपल्या लॅपटॉपवर सुरु असलेल्या मिटिंगकडे वळतो. यावेळी मजेत केलेल्या आपल्या या कृत्यावर पत्नी एक छान हास्य देते. 

इंधन दरवाढीवर अमूलचं कार्टूनद्वारे मार्मिक भाष्य; नेटिझन्सनं दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्याला दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर त्याच्या कमेंट बॉक्समध्ये नेटिझन्सने भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी पती-पत्नीमधील या मजेशीर क्षणाचं कौतुक केलं आहे. आजच्या जगात अशी आनंदी जोडपी असतील तर खरंच छान आहे, त्यांच्याकडून लोकांनी शिकायला हवं अशी प्रतिक्रियाही एका युजरने दिली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman tries to kiss husband during Zoom call meeting Viral video