
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्र्यांचा 'पद्मभूषण' स्विकारण्यास नकार
आज वर्ष 2020 च्या पद्म पुरस्कार (Padma Awards) जाहीर करण्यात आले असून यावर्षी चार जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे तर 17 जणांना पद्मभूषण (Padma Bhushan) पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच पद्मश्री पुरस्कार 107 जणांना जाहीर झाला आहे. दरम्यान पद्मभूषण विजेत्यांच्या यादीतील एक नाव पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (Buddhadeb Bhattacharjee) यांचे देखील आहे. मात्र, या ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्याने हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा: शरद पवारांच्या जिगरी दोस्ताला पद्मभूषण! पाठ थोपटत म्हणाले, 'मला अभिमान...'
एका निवेदनात पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्जी यांनी पद्मभूषण पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे म्हटले आहे. सध्या भट्टाचार्जी सध्या खूप आजारी आणि अंथरुणाला खिळले आहेत. त्यांच्या पक्षाचे राज्यसभा खासदार आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) नेते विकास भट्टाचार्य यांनी बुद्धदेव भट्टाचार्जी हे हा पुरस्कार स्विकारणार नाहीत असे सांगितले. त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा आजच करण्यात आली आहे.
हा पुरस्कार त्यांना जाहिर झाल्यानंतर बंगालच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे कारण भट्टाचार्जी हे कट्टरपंथीय आहेत आणि त्यांनी अनेक घटनांमध्ये मोदी सरकारला कडाडून विरोध केला होता. पद्मभूषण हा देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. भट्टाचार्य 2000 ते 2011 पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. यासोबतच ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्यही राहिले आहेत.
हेही वाचा: असे आहेत २०२२ च्या पद्म पुरस्कारांचे मानकरी; वाचा सविस्तर
Web Title: West Bengal West Bengal Former Cm Buddhadeb Bhattacharjee Refuses To Accept Padma Bhushan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..