West Bengal: ममतांवर मीम्स बनवल्याप्रकरणी यूट्यूबरला अटक, सात जणांचा शोध सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

west bengal youtuber arrested for meme on cm mamata banerjee search on for seven more content creators

West Bengal: ममतांवर मीम्स बनवल्याप्रकरणी यूट्यूबरला अटक, सात जणांचा शोध सुरू

पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातून एका 29 वर्षीय युट्युबरला मंगळवारी अटक करण्यात आली. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबद्दल अपमानास्पद मीम्स बनवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता पोलिसांच्या गुप्तचर शाखेच्या अधिकाऱ्यांनी आरोपी तुहीन मंडल याला त्याच्या घरातून अटक केली आहे. तो ताहेरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बापूजीनगर येथील रहिवासी आहे.

कोलकात्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, तुहिन मंडलकडे उत्पन्नाचे कोणताही निश्चित स्त्रोत नसल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणांचे काही भाग एडीट केले आहेत आणि प्रक्षोभक, अपमानास्पद मेम्स तयार केले आहेत. अशा कृत्यांमुळे हिंसाचार भडकू शकतो आणि शांतता बिघडू शकते, असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे.

हेही वाचा: Flipkart Sale : iPhone 13 च्या ऑर्डर आपोआप रद्द होतायत? कंपनी म्हणतेय की..

या तक्रारीत इतर सात कंटेंट क्रिएटर्सचीही नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना अटक करण्यासाठी शोध सुरू आहे. आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जूनच्या सुरुवातीला, कोलकाता पोलिसांनी लाइव्ह दरम्यान मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याबद्दल यूट्यूबर रोद्दूर रॉयला अटक केली होती. त्याचप्रमाणे, एप्रिल 2012 मध्ये, कोलकाता पोलिसांनी जादवपूर विद्यापीठाचे प्राध्यापक अंबिकेश महापात्रा यांना अटक केली होती, ज्यांच्यावर बॅनर्जी यांचे व्यंगचित्र ईमेलद्वारे फॉरवर्ड केल्याचा आरोप होता.

हेही वाचा: Navratri : शिंदे सरकारचा मोठा निर्णय! नवरात्रीत रात्री १२ वाजेपर्यंत खेळता येणार गरबा