सावधान! भारत-पाकमध्ये अणुयुद्ध झालंच, तर जगावर असा परिणाम होईल!

brayan-toon
brayan-toon

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांना विविध पातळ्यांवर प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अणुविषयक समितीची बैठक बोलावली. भारताशी तणाव निर्माण होताच पाकिस्तानकडून नेहमीच अणुहल्ल्याच्या धमक्या दिल्या जातात. आताही पाककडून असाच दबावाचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठीच ही बैठक बोलावण्यात आल्याचे बोलले जात आहे. असे असताना खरच अशी परिस्थिती निर्माण झाल्यास जगभरात याचे पडसाद कसे उमटतील याबबात शास्त्रज्ञ ब्रायन टून यांनी माहिती दिली आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये अशा प्रकारे अणू यूद्ध झाल्यास संपूर्ण जगाला भयानक परिणामांना सामेरे जावे लागेल. अणू हल्ला झाल्यास दोन आठवड्यात संपूर्ण जगभर धूराचे साम्राज्य पसरेल. याचा परिणाम कित्तेक दिवस सूर्यप्रकाश जमिनिवर पोहचू शकणार नाही. वातावरणात झालेल्या बदलामुळे मका, गहू आणि भाताच्या शेतीवर कित्तेक वर्ष याचा परिणाम राहिल.

संपूर्ण जगाकडे सगळ्यांना फक्त साठ दिवस अन्न पुरविण्याइतकाच साठा आहे. त्यामुळे शेतीचे उत्पादन बंद झाल्यास साऱ्या जगाला त्याचा फटका बसेल. त्यामुळे, युद्धानंतरही कित्तेक लोक अन्नपुरवठा न झाल्याने मरतील. 

अणूयूद्ध झाल्यास जगाचे तापमान हिमयूगाच्या वेळी होते त्यापेक्षाही खालची पातळी गाठेल. त्यावेळी आपण 'न्युक्लिअर विंटर'मध्ये असू. अशा तापमानात काहिही उगवणे शक्य नाही. अशा परिस्थितीत पृथ्वीवरील 90 टक्के लोक उपासमारिचे बळी ठरतील.

भारत आणि पाकिस्तानात यूद्ध झाल्यास कोणत्याच देश यामधून बाजूला राहू शकत नाही. ज्यांच्याकडे अणूशक्ती नाही अशा देशांना देखील याचा फटका बसणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com