'अफजल गुरूला 'त्या' स्वातंत्र्यसैनिक समजतात'

वृत्तसंस्था
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - "जे लोक "भारत माता की जय‘ म्हणू शकत नाहीत अशाच लोकांनी आम्ही निवडून देतो‘, असे म्हणत जम्मू काश्‍मिरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना दहशतवादी बुऱ्हाण लपून बसल्याचे माहित होते तसेच त्या दहशतवादी अफजल गुरूला स्वातंत्र्यसैनिक समजतात, असे त्यांनीच एका कार्यक्रमात सांगितल्याचा आरोप दिल्लीचे पर्यटन मंत्री कपिल मिश्रा यांनी केला आहे.

भारत इंटरनॅशनल ट्रॅव्हल बझारच्या (बीआयटीबी) कार्यक्रमात बोलताना मिश्रा म्हणाले, "जम्मू काश्‍मिरच्या मुख्यमंत्री मेहबुबा यांच्यासोबत एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर बसलो होतो. त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करताना त्यांना दहशतवादी बुऱ्हाण वाणी लपून बसल्याचे माहित होते असे त्यांनी सांगितलो. तर त्या अफजल गुरुला स्वातंत्र्यसैनिक समजतात.‘ तसेच "जर त्यांनी यावर काही उत्तर दिले नाही तर भारतीय जनता पक्षाला यावर उत्तर द्यावे लागेल. जे लोक देशावर प्रेम करत नाहीत आणि दहशतवाद्यांना दहशतवादी मानत नाहीत असे लोक सत्तेत येतात‘ अशी टीकाही त्यांनी केली.

‘आपण "भारत माता की जय‘ न म्हणणाऱ्यांना निवडून देतो. मला त्यांच्यासोबत मला व्यासपीठावर बसण्याची इच्छा नाही. त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसणे म्हणजे अपमान आहे. मी मेहबूबा मुफ्ती यांच्या निवडणुकीबाबत बोलत नसून या संवेदनशील विषयावरील त्यांच्या भूमिकेवर प्रश्‍न उपस्थित करत आहे‘ असेही मिश्रा पुढे म्हणाले.

Web Title: What do you consider Burhan Wani, Afzal Guru? Kapil Mishra asks