Pt. Bhimsen Joshi: पं. भीमसेन जोशींच्या किराणा घराण्याचा इतिहास अन् खासियत जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pt. Bhimsen Joshi

Pt. Bhimsen Joshi: पं. भीमसेन जोशींच्या किराणा घराण्याचा इतिहास अन् खासियत जाणून घ्या

Kirana Gharane: भीमसेन जोशींचे वडील एक शिक्षक होते. भीमसेनचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना पसंत नव्हता. भीमसेनांनी वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. या मतभेदांमुळे अखेरत्यांनी इ.स. १९३३ साली वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडले आणि ते ग्वाल्हेरात दाखल झाले.काही वर्षे ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर येथे व्यतीत केल्यानंतर त्यांचा शोध घेत असलेल्या वडिलांशी त्यांची भेट झाली आणि भीमसेन पुन्हा घरी परत आले. 

हेही वाचा: Food Recipe : उपवासाचे तेच पदार्थ खाण्याची इच्छा नाहीये? एकादशी निमित्त बनवा खमंग भगरीचे धिरडे

भीमसेनांचा संगीतासाठीचा तीव्र ओढा पाहून त्यांचे वडील भीमसेनांना जवळच असलेल्या कुंदगोळ गावातील रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे घेऊन गेले आणि रामभाऊंनी भीमसेनांना त्यांचे शिष्यत्व दिले. रामभाऊ ’सवाई गंधर्व’ म्हणून ख्यातनाम होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, भीमसेनांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. रामभाऊ हे किराणा घराण्याच्या पद्धतीचे गायक होते आणि त्यांच्याकडून भीमसेनांनी इ.स. १९३६ ते इ.स. १९४१ पर्यंतच्या काळात शक्य तेवढे ज्ञान आत्मसात केले. 

हेही वाचा: Anarkali Suit Fashion : लग्नापासून ते कॅज्यूअल वेअरपर्यंत सर्वांसाठी परफेक्ट असा एकमेव सूट

संगीत क्षेत्रात किराणा घराणं खूप मोठं आहे; इसवी सन १३ च्या शतकात दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीने जेव्हा देवगिरी जिंकले तेव्हा त्याने देवगिरीच्या दरबारातील अनेक संगीततज्ज्ञांना पळवून दिल्लीला नेले. त्यांपैकी असलेले एक गोपाळ नायक, हे किराणा घराण्याचे आद्य संस्थापक. किराणा घराण्याचे प्रवर्तक समजले जाणारे उस्ताद अब्दुल करीम खान हे गोपाळ नायक यांनी निर्माण केलेल्या संगीत परंपरेतील पाचव्या पिढीचे गायक.

हेही वाचा: Food Recipe : बनवा पालक पनीर दम बिर्याणी फक्त ३५ मिनिटात

नक्की कसं आलं किराणा नाव?

उस्ताद अब्दुल करीम खान, हे उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरजवळच्या शामली जिल्ह्यातील कैराना नावाच्या गावाचे रहिवासी होते. त्यावरून या घराण्याचे नाव कैराना पडले. मात्र, पुढे हे घराणे ’किराणा’ (हिंदीत किराना) या नावाने प्रसिद्धीस आले.

हेही वाचा: Travel In Pune : पुण्यातल्या पुण्यातच विकेंड प्लॅन करायचा आहे? मग पू.ल देशपांडे उद्यान आहे बेस्ट

किराणा घराण्याची गायकी वैशिष्ट्ये:- 

किराणा घराण्याची गायकी मुख्यतः तंत-अंगाची आहे. तंत-अंग म्हणजे बीनवादनाचे अंग. तंबोरा लावला तरी त्याचेही योगदान नावापुरतेच. तंबोऱ्यांच्या जोडीतला एक तंबोरा पंचमात आणि दुसरा निषादात लावण्याची प्रथा अब्दुल करीमखाँनीच प्रथमतः सुरू केली.  

हेही वाचा: Tuesday Fitness: माधुरी अजुनही एवढी सुंदर कशी? काय आहे फिटनेसचं सिक्रेट?

या घराण्यातील गायक आवाज दाबून लावतात.  शिवाय त्यांच्या स्वराची पट्‌टीही उंच असते.  त्यामुळे त्यांचे गायन श्रवणमधुर वाटले, तरी आवाजात कृत्रिमता डोकावते आणि गळ्यावर ताण पडताना दिसतो. पण स्वरांचे अनेक प्रकारांनी आकुंचन-प्रसरण करण्याचे रंजक कौशल्य या गायकीत भरपूर प्रत्ययाला येते.  

हेही वाचा: Pune Travel : पुण्याजवळ वनडे ट्रीप करायची आहे? चुकवू नये अशी बेडसे लेणी

ग्वाल्हेर घराण्यात गातात, त्याप्रमाणे अस्ताई-अंतऱ्याची संपूर्ण बंदिश या घराण्यात रेखीवपणाने गातातच, असं नाही. गातांना सुरुवात विलंबित लयीत करून मग हळूहळू लय वाढवली जाते. संथ व संयत अशा आलापप्रधान गायकीमुळे दरबारी कानडा, मियाँ मल्हार, तोडी, ललित, मालकंस, शुद्ध कल्याण, पूरिया इ. पूर्वांगप्रधान राग सरस व परिणामकारक वठतात. 

हेही वाचा: One Day Trip Near Pune : पुण्याजवळची विकेंड वन डे ट्रिपसाठी परफेक्ट अशी 5 ठिकाणं

सुरेलपणा हा या गायकीचा आत्मा असून ते त्यायोगे मैफल धुंद करून, ती कारुण्य व जिव्हाळा यांनी प्रायः भरून टाकतात. या घराण्यातील गायक तंबोरे ऐकून गात असल्याने षड्‌जाचा सतत सूक्ष्म कानोसा घेतात. आलापीच्या मानाने तानेला या गायकीत दुय्यम स्थान असते; तानांची रचनाही फारशी गुंतागुंतीची नसते. 

हेही वाचा: Trampoline Park : लहानपण मनमुराद जगता येईल अशा पुण्यातील ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये एक टूर तो बनती है!

ख्याल, ठुमरी, नाटकीय पदे, भजने यांतील कोणत्याही प्रकारामध्ये हे गायक खास असा ढंग आणीत नाहीत. या घराण्याची सरगम सौष्ठवयुक्त असून ठुमरीत ती विशेष शोभिवंत दिसते. पूरब, बनारसी, पंजाबी या अंगांच्या ठुमरीपेक्षा किराणा घराण्याची ठुमरी काहीशी वेगळी आहे. ही ठुमरी बोल-अंगापेक्षा स्वर-अंगाने अधिक नटविली जाते त्यामुळे शब्दांचे किंवा बोलफेकीचे महत्त्व त्यात मध्यम दर्जाचे आहे. या घराण्यात टप्पा हा गायनप्रकार नाही. 

टॅग्स :musicMusic album