भय्यू महाराजांनी आत्महत्या करण्यापूर्वी नेमकं काय घडलं ?

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जून 2018

आधात्मिक गुरु भैय्यूजी महाराजांनी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. मध्यप्रदेशातील इंदूर येथील त्यांनी राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडली. पोलिसांनी प्राथमिक तपासात घरगुती तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, त्यांच्या मुलीने आणि दुसऱ्या पत्नीने पोलिस चौकशीदरम्यान एकमेकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. 

इंदूर - आधात्मिक गुरु भैय्यूजी महाराजांनी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. मध्यप्रदेशातील इंदूर येथील त्यांनी राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडली. पोलिसांनी प्राथमिक तपासात घरगुती तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, त्यांच्या मुलीने आणि दुसऱ्या पत्नीने पोलिस चौकशीदरम्यान एकमेकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. 

भय्यू महाराज यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्यावर आलेल्या तणावामुळे आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर, आपल्या आत्महत्येसाठी कोणालाही कारणीभूत ठरवू नये असे त्यांनी लिहले आहे. यावरुन, प्राथमिक तपासात असे वर्तवण्यात येत आहे की, 2015 मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यावर ते खुप अस्वस्थ होते. म्हणून त्यांनी डॉ. आयुषी यांच्यासोबत दुसरा विवाह केला. माधवी यांच्यापासून त्यांना कूहू नावाची एक मुलगी आहे. तिचा दुसऱ्या विवाहाला विरोध होता. त्यामुळे त्यांच्यातील तणाव वाढत गेला. दुसरी पत्नी डॉ. आयुषी यांचा 8 जून रोजी वाढदिवस होता परंतु, त्याही दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर तणाव जाणवत होता.

दरम्यान, त्यांच्या मुलीने चौकशीदरम्यान डॉ. आयुषी यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. मी डॉ. आयुषी यांना आई मानत नाही, त्यांच्यामुळेच आपल्या वडिलांनी अशा प्रकारचे पाऊल उचलले आहे. त्यांना अटक करा, अशी मागणी तिने केली आहे. त्याचबरोबर, डॉ. आयुषी यांनी सांगितले की, मी आणि माझी मुलगी कुहुला आवडत नव्हतो. त्यामुळेच, मुलीच्या जन्मानंतर मी आईकडे रहायला गेले. कुहु पुण्याला गेल्यानंतर काही दिवसानंतर मी इंदुरला रहायला आले. 

मंगळवार 11 जूनच्या रात्री मुलगी कुहु येणार आहे. तिच्या खोलीची साफसफाई केली नाही, या कारणावरुन पत्नी डॉ. आयुषी आणि त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर त्यांनी स्वतः नोकरांकडून खोली साफ करुन घेतली, व त्याच खोलीत आत्महत्या केली. त्याचबरोबर, ते प्रत्येक गोष्टीत पत्नीपेक्षा जास्त मुलीची बाजू घेत असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: What happened before Bhaiyu Maharaj suicide?