esakal | ‘पतंजली’ची वार्षिक उलाढाल किती आहे पहा!
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdev Baba

‘पतंजली’ची वार्षिक उलाढाल किती आहे पहा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - रामदेव बाबा (Ramdev Baba) यांच्या नेतृत्वाखालील पतंजली समूहाने (Patanjali Group) २०२०-२१ या आर्थिक वर्षात तब्बल ३० हजार कोटी रुपयांची उलाढाल (Transaction) नोंदविली आहे. आगामी ३-४ वर्षांत कंपन्या कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पतंजली समूहाने म्हटले आहे. (What is Patanjali Annual Income)

पतंजली समूहाने गेल्या आर्थिक वर्षात रूची सोया ही कंपनी संपादित केली होती. या कंपनीच्या १६,३१८ कोटी रुपयांच्या उलाढालीचा लाभ पतंजली समूहाला झाला. ‘रूची सोया’च्या फॉलो-ऑन पब्लिक ऑफरच्या (एफपीओ) माध्यमातून या कंपनीचे कर्ज कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे रामदेव बाबा यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. रूची सोया या कंपनीवर ३३०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. आगामी काळात पतंजली समूहातील पतंजली आयुर्वेद या एफएमसीजी कंपनीचीदेखील बाजारात नोंदणी केली जाणार असल्याचे रामदेव बाबा यांनी सूचित केले. मात्र, यासाठीचा निश्चित कालावधी जाहीर केला नाही.

हेही वाचा: साधू-संतांमार्फत हिंदुत्वाचा अजेंडा चालवणार - मोहन भागवत

सरलेल्या आर्थिक वर्षात ‘पतंजली आयुर्वेद’ने ९७८३.८१ कोटी रुपयांची उलाढाल नोंदविली आहे. त्याचबरोबर ‘पतंजली नॅचरल बिस्कीटस’ने ६५० कोटी रुपयांची, ‘दिव्या फार्मसी’ने ८५० कोटी रुपयांची आणि ‘पतंजली ॲग्रो’ने १६०० कोटी रुपयांची उलाढाल केल्याचे सांगण्यात आले. शिवाय पतंजली परिवहन या दळणवळण विभागाने ५४८ कोटी रुपयांची आणि ‘पतंजली ग्रामोद्योग’ने ३९६ कोटी रुपयांची उलाढाल नोंदवून समूहाच्या कामगिरीत महत्त्वाचा वाटा उचलला आहे.

समूहाची लक्षवेधक प्रगती

पतंजली समूहाने अलीकडेच संपादित केलेल्या रूची सोया या कंपनीविषयी बोलताना रामदेव बाबा म्हणाले, की ‘रूची सोया’मध्ये आम्ही सुमारे २४ टक्क्यांनी प्रगती नोंदविली आहे. ‘पतंजली’चा विचार करता, २०१९-२० मधील ११ हजार कोटी रुपयांवरून २०२०-२१ मध्ये १४ हजार कोटी रुपयांपर्यंत पोचलो आहोत. आमच्या कंपन्यांमध्ये आम्ही १० ते २४ टक्क्यांपर्यंत प्रगतीचा दर राखला आहे.

loading image