esakal | साधू-संतांमार्फत हिंदुत्वाचा अजेंडा चालवणार - मोहन भागवत
sakal

बोलून बातमी शोधा

Mohan Bhagwat

साधू-संतांमार्फत हिंदुत्वाचा अजेंडा चालवणार - मोहन भागवत

sakal_logo
By
अमित उजागरे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएस आपला हिंदुत्वाचा अजेंडा चालवण्यासाठी साधु-संतांची मदत घेणार आहे. अयोध्येतील राम मंदिर निर्मितीत संतांची विशेष भूमिका राहिली आहे. त्यामुळे याच आधारे साधू-संतांच्या सहाय्याने हिंदुत्वाच्या अजेंडा राबवला जाईल, असं आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. (with the help of saints RSS Will Carry Forward Hindutva Mohan Bhagwat aau85)

हेही वाचा: राज्यात नव्या पाच कारागृहांचा प्रस्ताव; शिकागोच्या धर्तीवर होणार बांधणी

आरएसएसच्या पाच दिवसीय राष्ट्रीय चिंतन बैठकीत शेवटच्या दिवशी मंगळवारी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विशेष चर्चा झाली. यामध्ये संघाच्या नेतृत्वानं निर्णय घेतला की, साधू-संतांना पुढे आणत विश्व हिंदू परिषद आणि संघाशी संलग्न इतर संघटनांतील लोकांकडे याची जबाबदारी दिली जाईल, असं भागवत म्हणाले.

हेही वाचा: महागाई रोखण्यात केंद्र अपयशी; पी. चिदंबरम यांचा हल्ला

भागवत म्हणाले, कुंभमेळ्याप्रमाणं इतर धार्मिक कार्यक्रमात साधू-संतांच्या सहकार्यानं हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेला जाईल. उत्तर प्रदेश सरकारद्वारे अयोध्येत दिवाळीत दीपोत्सव आणि मथुरेत जन्माष्टमीचं आयोजन करणं प्रशंसनीय आहे.

हेही वाचा: जगभरात तिसऱ्या लाटेची चिन्हं दिसू लागलीत; केंद्राचा भारतीयांना इशारा

त्याचबरोबर चित्रकुटमध्ये होणाऱ्या आमावस्या मेळावा आणि दिवाळीतील दीप मेळाव्याला भव्य स्वरुप देण्यावर त्यांनी जोर दिला. त्याचबरोबर देशातील अन्य धार्मिक कार्यक्रमांना भव्य बनवण्याचा संकल्प केला. गावांमध्ये रामलीला आणि अन्य धार्मिक कार्यक्रम सुरुच राहण्यासाठी सर्वांना मिळून प्रयत्न करण्याचा सल्लाही दिला.

loading image