PM Modi employment scheme, Pradhanmantri Viksit Bharat Rojgar Yojana, : देश आज 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून सलग 12 व्यांदा राष्ट्रध्वज फडकवला. तसेच देशालाही संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी तरुणांसाठी मोठी घोषणा केली. आजपासून देशात प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना सुरु करत असल्याचे त्यांनी सांगितलं.